गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी खुशखबर! भाजप ट्रेन आणि बसेसची व्यवस्था करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 02:26 PM2023-09-13T14:26:58+5:302023-09-13T14:31:33+5:30
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई- गणेशोत्सवासाठीकोकणात जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी भाजपकडून ६ विशेष रेल्वे आणि बसेसची व्यवस्थी करण्यात आली आहे. मुंबईतील विविध भागातून या बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी या ट्रेन सोडल्या जातील अशी माहिती समोर आली आहे.
सुनावणीवेळी हजर राहा! ठाकरे गटाकडून 'या' ३ अपक्ष आमदारांनाही अपात्रतेची नोटीस
गणपतीसाठी प्रत्येक वर्षी कोकणात चाकरमानी जात असतात. तीन महिन्यापूर्वीच सर्व ट्रेन आणि बसेस फुल झाल्या आहेत, यामुळे आता कोकणातील नागरीकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता या चारकरमान्यांसाठी भाजप मदतीला आली आहे. मुंबईतून २५० बसेस आणि सहा ट्रेन सोडण्यात येणार आहेत. शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याचे बोलले जात आहे.
काही महिन्यात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिकेसाठी भाजपने मोठी तयारी सुरु केली आहे. मुंबईत कोकणातील मतदार मोठ्या संख्येने राहतात आहे. यामुळे कोकणवासीयांसाठी भाजपपने ट्रेन आणि बसेसची व्यवस्था केली असल्याचे बोलले जात आहे.
एसटीच्या साडेचार हजार गाड्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी
गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात जातात. काही रेल्वे, एसटीने तर काही खासगी वाहनाने जातात. चाकरमान्यांच्या संख्येचा विचार करता यंदा रेल्वेकडूून आतापर्यंत ३१२ फेऱ्यांची घोषणा केली आहे; पण सामान्यांना तिकीट मिळत नाही. तर गणेशोत्सव काळात खासगी बसने जाण्याशिवाय पर्याय नाही. बसचालक दुप्पट, तिप्पट भाडे आकारून प्रवाशांचा खिसा कापतात. एसटीच्या साडेचार हजार गाड्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी असणार आहे. त्यामुळे खासगी बसचे तिकीट दर ‘जैसे थे’ आहेत. तरीही गणेशोत्सवासाठी कोकण प्रवाशांच्या लुटीला लगाम लागणार की ऐन गर्दीच्या वेळी त्यांची लूट सुरू होणार, असा सवालही प्रवासी विचारत आहेत.
गणेशोत्सव काळात कोकणासह इतर जिल्ह्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असते. कोकणात जाण्यासाठी शासनाकडून तसेच रेल्वे सुविधा ही असते, परंतु ऐनवेळी ही सुविधा मिळत नाही. त्यामुळे प्रवासीवर्गास खासगी बसने जावे लागते. मात्र, खासगी बसचालक या संधीचा फायदा घेत नेहमीपेक्षा अवाच्या सव्वा दराने पैशांची मागणी करतात. प्रवाशांनाही नाइलाजाने आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. एसटीच्या महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे प्रवासी वर्ग एसटीकडे वळला आहे. खासगी वाहतुकीला कमी प्रतिसाद असल्याने तूर्तास तरी तिकीट दर कमी आहे.