पाडव्याला मेट्रोचा शुभारंभ, मुंबईकरांनो खूशखबर! प्रवास होणार वेगवान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 08:44 AM2022-03-27T08:44:16+5:302022-03-27T08:44:39+5:30
मेट्रो २ अ आणि ७ ला पाडव्याचा मुहूर्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एमएमआरडीएकडून मुंबईच्या पश्चिम उपनगरात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ पाडव्याच्या मुहूर्तावर मार्गी लागणार आहेत. दोन्ही मेट्रोची अपेक्षित कामे जवळजवळ पूर्ण झाली असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून आवश्यक प्रमाणपत्र प्राधिकरणाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित असलेली पश्चिम उपनगरातील मेट्रो आता धावणार असून, यानिमित्ताने मुंबईचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
पश्चिम उपनगरातील मेट्रो सुरू करण्यासाठी आम्ही सगळी तयारी सुरू केली आहे. आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत मेट्रो सुरू होईल. वेगाने आम्ही काम करत आहोत. दोन-एक दिवसांत मेट्रो कधी रुळावर आणायची, यासंदर्भातील तारीख निश्चित केली जाईल. मुंबईकरांना खुशखबर देण्यासाठी आम्ही तयार आहोत.
- एस. व्ही. आर. श्रीनिवास,
महानगर आयुक्त, एमएमआरडीए
दहिसर पूर्व ते डहाणूकर वाडी
मेट्रो ७ : आरे ते दहिसर पूर्व
nकिती असेल तिकीट : किमान तिकीट १०, तर कमाल तिकीट ४० रुपये असणार आहे.
nकिती मेट्रो धावणार : ११ मेट्रो
nआरे ते डहाणूकर वाडी असा मेट्रोचा टप्पा सेवेत दाखल होईल.
nदहा मिनिटांनी एक मेट्रो धावेल.
nमेट्रो लाइन २ अ : ६,४१० कोटी.
nमार्ग : दहीसर पूर्व ते डीएन नगर
nलांबी : १८.५ किमी
nस्थानके : आनंद नगर, ऋषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूर नगर, गोरेगाव, आदर्श नगर, शास्त्री नगर, डीएन नगर
nमेट्रो लाइन ७ : ६.२०८ कोटी
nमार्ग : अंधेरी पूर्व आणि दहीसर पूर्व
nलांबी : १६.४७५ किमी
nस्थानके : दहीसर (पूर्व). ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व)