खूशखबर! तलाव ९९ टक्के फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 01:05 AM2020-09-30T01:05:08+5:302020-09-30T01:05:52+5:30

‘नो’ टेन्शन; दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक जलसाठा

Good news! The lake is 99 percent full | खूशखबर! तलाव ९९ टक्के फुल्ल

खूशखबर! तलाव ९९ टक्के फुल्ल

Next

मुंबई : दोन पावसाळी महिने कोरडे गेल्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या मान्सूनने उरलेले दोन महिने डोळ्यात पाणी आणले. मात्र मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले तरी पाण्याचे टेन्शन मात्र वर्षभरासाठी मिटवले आहे. एवढेच नव्हे, तर गेल्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तलाव क्षेत्रात केवळ ३४ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे यंदा मुंबईवर भीषण पाणी संकट ओढवणार, असे चिन्ह होते. महापालिकेने खबरदारी म्हणून ५ आॅगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू केली. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने मुंबईसह तलाव क्षेत्रात चांगलाच जोर धरला. सर्व तलाव काठोकाठ भरल्यामुळे पालिका प्रशासनाने आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस २० टक्के पाणीकपात मागे घेतली. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. सध्या ९९.१३ टक्के म्हणजेच १४ लाख ३४ हजार ५६१ दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. २०१८ मध्ये सप्टेंबर अखेरीस तलावात अवघे ९१ टक्के जलसाठा शिल्लक होता. तर २०१९ मध्ये ९९.५ टक्के जलसाठा होता.

२९ सप्टेंबर २०२० रोजी जलसाठ्याची आकडेवारी
तलाव कमाल किमान उपयुक्त सध्या
साठा (दशलक्ष)
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १२८६३८ १६३.०४
तानसा १२८.६३ ११८.८७ १४३९४६ १२८.५७
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.१७
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०२७ १३९.१६
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ २२५११९ ६०३.४५
भातसा १४२.०७ १०४.९० ७१३१९६ १४१.९३
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १८७९३७ २८३.९६

वर्ष जलसाठा टक्के
२०२० १४३४५६१ ९९.१२
२०१९ १४३३५९० ९९.०५
२०१८ १३२६९१० ९१.६

सर्व तलाव काठोकाठ भरल्यामुळे पालिका प्रशासनाने आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस
२० टक्के पाणीकपात मागे घेतली.

Web Title: Good news! The lake is 99 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.