मुंबई : म्हाडाकडून २४ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) कलानगर, म्हसरूळ शिवार येथील अल्प व मध्यम उत्पन्न गटातील २४ सदनिका सोडत पद्धतीने वाटप करण्यासाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता या घरांसाठीनाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ येथे सोडत काढली जाईल.
अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी प्रत्येकी १२ घरांची लॉटरी काढली जाईल. पार्कींग अधिक ६ मजले असे घरे असलेल्या इमारतीचे स्वरुप आहे. अल्प गटासाठीचे क्षेत्रफळ ४१.९६ चौमी ते ४३.७५ चौमी आहे. याची किंमती १३ लाख ४७ हजारापासून १४ लाख ५ हजार आहे. अर्जासोबत १० हजार रुपये भरावे लागतील. अर्जदाराची सरासरी मासिक उत्पन्न मर्यादा २५ हजार १ ते ५० हजार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठीचे क्षेत्रफळ ६०.९ चौमी ते ६०.१४ चौमी आहे. याची किंंमत २० लाख २३ हजारापासून २० लाख २५ हजारापर्यंत आहे. अर्जासोबत १५ हजार रुपये भरावे लागतील. अर्जदाराची सरासरी मासिक उत्पन्न मर्यादा ५० हजार १ ते ७५ हजार रुपये आहे.
म्हाडाच्या येथील घरांसाठी अर्ज स्विकृती व विक्रीचा कालावधी २९ जून ते ३० जुलै २०२० असा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत याबाबतचे काम होईल. मिळकत व्यवस्थापक यांचे कार्यालय, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण भवन, राम गणेश गडकरी चौक, आयकर भवनासमोर, नाशिक येथे अर्ज विक्री व स्विकृती होईल.