शुभवार्ता! मान्सून काही तासांत मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 06:57 AM2024-06-09T06:57:35+5:302024-06-09T06:58:14+5:30
Monsoon News: मान्सूनची दणक्यात सुरुवात झाली असून राज्याच्या बहुतांशी भागात कोसळधारा बरसल्या. राज्याच्या विविध भागांत शुक्रवारी रात्री आणि शनिवारी जोरदार पाऊस झाला. दक्षिण कोकणात रेंगाळलेला मान्सून येत्या ७२ तासांत मुंबईत दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविला आहे.
मुंबई - मान्सूनची दणक्यात सुरुवात झाली असून राज्याच्या बहुतांशी भागात कोसळधारा बरसल्या. राज्याच्या विविध भागांत शुक्रवारी रात्री आणि शनिवारी जोरदार पाऊस झाला. दक्षिण कोकणात रेंगाळलेला मान्सून येत्या ७२ तासांत मुंबईत दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविला आहे. सिंधुदुर्ग, सांगली, साताऱ्यासह रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून पावसाने जोर धरला.
विजा चमकत असताना काय करावे?
nविजा चमकत असताना संगणक, टीव्ही आदी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून विलग करून ठेवावीत.
nदूरध्वनी, माेबाईलचा वापर टाळावा. विजेच्या खांबांपासून लांब राहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
राज्यात काय?
उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार आहे.
मुंबईत काय?
मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. सायंकाळी, रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
मान्सूनची सीमा रेषा पुढे सरकरण्यासाठीचे हवामान अनुकूल आहे. येत्या ७२ तासांत मान्सून मुंबईत दाखल होईल.
- सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग