कल्याण, पनवेलवासियांना खुशखबर; स्थानिक संस्था करात सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 01:52 PM2019-01-01T13:52:47+5:302019-01-01T13:53:38+5:30
मंत्रिमंडळ बैठकीत आज काही निर्णय घेण्यात आले आहेत.
मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने कल्याणमधील 27 गावे आणि पनवेल महापालिकावासियांना खूशखबर दिली असून स्थानिक स्वराज्य संस्था करात सूट देण्यास मंजुरी दिली आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला राष्ट्रीय महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळण्यासाठी 125 कोटी, अपंग वित्त व विकास महामंडळाला 70 कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला 70 कोटी, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला 50 कोटींची शासन हमी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आली आहे.
कल्याण- डोंबिवलीमध्ये नव्याने 27 गावांसाठी स्थानिक संस्था कर अभय योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच पनवेल महापालिकेतील स्थानिक संस्था करातील सूट पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंजुरी देण्य़ात आली आहे.
राज्यातील पर्यटन प्रसिद्धीसाठी, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित कार्यक्रमांना पर्यटन विभाग अंतर्गत प्रायोजकत्व देण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे.