Join us

शुभवर्तमान : कोरोनाचा संसर्ग झालेले बरे होण्याचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 6:11 AM

सहा महिन्यांचा चिमुकला, ८३ वर्षांच्या आजीबार्इंसह राज्यात २९५ कोरोनामुक्त

मुंबई : सहा महिन्यांच्या चिमुकल्यापासून ते ८३ वर्षांच्या आजीबार्इंपर्यंत विविध वयोगटातील बाधित बरे होण्याचे राज्यातील प्रमाण वाढत आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद व आरोग्य यंत्रणेचे परिश्रमाने आतापर्यंत २९५ रुग्ण बरे झाले. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रुग्ण् बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले होते. कोरोनाला हरविणाऱ्या सहा महिन्यांच्या कल्याण येथील चिमुकल्याच्या आईशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्याचे अभिनंदनही केले. ९ मार्चला राज्यात पहिले दोन रुग्ण आढळले. पुण्यातील हे दाम्पत्य यशस्वी उपचारानंतर २३ मार्चला घरी गेले. राज्यातील हे पहिले कोरोनामुक्त रुग्ण होते.

६० ते ६० टक्क्यांमध्ये लक्षणे नाहीतचाचणीसाठी पाठवलेल्या ५२ हजार जणांच्या नमुन्यांपैकी आतापर्यंत ४८,१९८ निगेटिव्ह तर २९१६ पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी सुमारे ६० ते ७० टक्के जणांमध्ये लक्षणे दिसली नाहीत. २५ टक्के जणांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसली. तर पाच टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.रुग्णांच्या दुपटीचा वेग दोनवरून सहा दिवसांवरकोरोना रूग्णवाढीचा वेग मंदावला आहे. रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा आधी दोन दिवसा होता. पुढे तो साडतीन दिवस झाला आणि आता हा वेग सहा दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल. - राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्यमंत्रीरुग्णसंख्येतही घट : रु ग्णांच्या संख्येने तीन हजार रु ग्णांचा आकडा पार केला असला तरीही दोन दिवसांत ही संख्या वाढण्याचा वेग मात्र कमी झाला आहे. मुंबईत काही दिवसांत झालेल्या वाढीच्या तुलनेत रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रकोरोना सकारात्मक बातम्याउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्या