मुंबई - मुंबई पोलीस दलात महिलांसाठी एक अनोखं अभियान पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलं आहे. आज पोलीस आयुक्तालयात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास मुख्य नियंत्रण कक्षात पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या पत्नी शर्मिला बर्वे यांच्या हस्ते स्मार्ट मैत्रीण अभियान सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
स्मार्ट मैत्रीण अभियानाअंतर्गत मुंबई पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्यात, विभागीय कार्यालय आणि इतर सर्व शाखांमध्ये ऐकून १४० सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग आणि बर्निंग मशीन महिलांच्या सोयीसाठी लावण्यात येणार आहे. हा अनोखा असा उपक्रम पोलीस आयुक्त बर्वे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले. या अभियानाची सुरुवात पोलीस आयुक्तालयातील मुख्य नियंत्रण कक्षापासून करण्यात आली. या कार्यक्रमास सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या पत्नी, पोलीस उपायुक्त एन. अंबिका आणि नियती ठाकर आणि स्मार्ट मैत्रीण अभियानाचे अध्यक्ष राजेंद्र धेंडे तसेच कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी हजर होते.