Join us

विद्यार्थ्यांना खूशखबर : बारावीतील नापासचा शेरा होणार गायब!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 6:07 AM

विद्यार्थ्यांना खूशखबर : दहावीप्रमाणे शेरे देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासचा शेरा काढून ‘पुनर्परीक्षेसाठी पात्र’ किंवा ‘कौशल्य विकासासाठी पात्र’ शेरे देण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरविले आहे. दहावीच्या गुणपत्रिकेवरून नापास/ अनुत्तीर्ण शेरा याआधीच काढून टाकण्यात आला आहे. याचप्रमाणे कौशल्य विकास विभागाने १० वी, १२ वीतील ‘कौशल्य विकासासाठी पात्र’ असा शेरा मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य सेतू योजना आखली आहे. आता बारावीच्या गुणपत्रिकेवरही सुधारित शेरे असतील.

बारावीत नापास शेरा मिळाल्याने विद्यार्थी खचून जातात. काहींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने बारावीच्या गुणपत्रिकेवरही यापुढे नापास असा शेरा लागणार नाही, त्याऐवजी ‘पुनर्परीक्षेसाठी पात्र’ किंवा ‘कौशल्य विकासासाठी पात्र’ असे सुधारित शेरे देण्याचा निर्णय जारी केला आहे. हे बदल यंदाच्या गुणपत्रिकेत दिसतील.कोणासाठी आहे योजना?बारावीच्या पुरवणी परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास विभागाच्या कौशल्य सेतू योजनेचा लाभ मिळेल. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षण दिले जाईल. आॅनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध असेल.गुणपत्रिकेत करण्यात येणारे बदलतपशील प्रचलित पद्धती सुधारित शेरेसर्व विषयांत उत्तीर्ण असल्यास उत्तीर्ण उत्तीर्णश्रेणी विषयासह एक / अनुत्तीर्ण पुनर्परीक्षेसाठीदोन विषयांत अनुत्तीर्ण असल्यास पात्रश्रेणी विषयासह तीन किंवा अनुत्तीर्ण पुनर्परीक्षेसाठीत्याहून अधिक विषयांत अनुत्तीर्ण पात्रपुनर्परीक्षा गुणपत्रिकेत होणारे बदलतपशील प्रचलित पद्धती सुधारित शेरेपुरवणी परीक्षेत सवलत घेतलेल्या उत्तीर्ण उत्तीर्णविषयासह सर्व विषयांत उत्तीर्णश्रेणी विषयासह एक / अनुत्तीर्ण पुनर्परीक्षेसाठीदोन विषयांत अनुत्तीर्ण असल्यास पात्रश्रेणी विषयासह तीन किंवा त्याहून अनुत्तीर्ण कौशल्यअधिक विषयांत अनुत्तीर्ण विकासास पात्रराज्यात सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती आहे, त्यांना या निर्णयाने दिलासा मिळू शकतो.

टॅग्स :12वी परीक्षापरिणाम दिवस