चांगल्या योजना तयार आहेत फक्त सत्ता द्या - उद्धव ठाकरे

By Admin | Published: October 11, 2014 11:14 PM2014-10-11T23:14:05+5:302014-10-11T23:14:05+5:30

महाराष्ट्राच्या विकासाकरीता चांगल्या योजना तयार आहेत फक्त तुम्ही शिवसेनेला पुर्ण ताकदीची सत्ता द्या असे आवाहन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

Good plans are just giving power - Uddhav Thackeray | चांगल्या योजना तयार आहेत फक्त सत्ता द्या - उद्धव ठाकरे

चांगल्या योजना तयार आहेत फक्त सत्ता द्या - उद्धव ठाकरे

googlenewsNext
>बोईसर : महाराष्ट्राच्या विकासाकरीता चांगल्या योजना तयार आहेत फक्त तुम्ही शिवसेनेला पुर्ण ताकदीची सत्ता द्या असे आवाहन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथे पालघर लोकसभा क्षेत्रतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभेत शनिवारी केले. 
बोईसर-तारापुर रस्त्यावरील पास्थळ येथील आंबट गोड मैदानावर प्रचारसभा घेण्यात आली. काही वर्षापुर्वी वाढवण बंदर शिवसेनेने कसे परतवून लावले त्याची आठवण करून देऊन नांदगाव-आलेवाडी येथे नियोजित जिंदाळची जेटी उभारणीला स्थानिकांचा विरोध असेल तर शिवसेनेचे सरकार आले तर कोणाची हिम्मत आहे जेटी उभारणीस आम्ही स्थानिकांच्या पाठीशी राहू अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. तर तारापुर एम.आय.डी.सी. तील कंत्रटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरी ही अट मी घालीन असे सांगितले.
ठाकरे यांनी भाजपा बाबत बोलताना संकट काळात ज्यांना साथ दिली त्यांनीच घात केल्याचे सांगुन पंचवीस वर्षाची युती भाजपाने का तोडली याचे उत्तर माङयाकडे नसल्याचे सांगितले. आता भगवी डोकी पेटून उठली आहेत त्यामुळे पालघर लोकसभा क्षेत्रतील सर्वच्या सर्व शिवसेनेचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. भविष्यातील मुख्यमंत्र्याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्ली तर महाराष्ट्रच ठरविणार, तो अधिकार आपला आहे. असे सांगुन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवरायाला मुजरा करणारा असावा. 
दिल्लीसमोर झुकणारा नसावा असे सांगुन ही निवडणुक तुमच्या आमच्या उज्वल भविष्याची असुन तुम्ही सांगताहेत मीच मुख्यमंत्री होणार परंतु तुमचे मत दिले तर मी निश्चितच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही ठाकरे यांनी शेवटी व्यक्त केला.  व्यासपिठावर शिवसेनेचे पालघर, वसई, नालासोपारा, विक्रमगड, डहाणू, बोईसर येथील शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते.  (वार्ताहर)

Web Title: Good plans are just giving power - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.