- मनोहर कुंभेजकर
मुंबई- जुहू चौपाटीवर जुहू मोरागाव मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खास 21 डिसेंबर 2017 पासून बोटिंग राईड सेवा सुरू केली आहे. गळ्यात जॅकेट घालून 16 सीटर फेरीबोटीचा आणि 8 सीटर मोटर बोटीचा सुमारे 15 ते 20 मिनीटे या राईडचा आनंद पर्यटक लुटतात.अथांग समुद्र,आकाशात दर तीन मिनिटांनी जाणारी विमाने आणि पर्यटकांनी फुललेल्या जुहू चौपाटी,सायंकाळी पालिकेने लावलेल्या एलइडी दिव्यांमुळे कुटुंबासह बोटिंग राईडचा थ्रिलिंग मनमुराद आनंद मिळाला अशी माहिती वर्सोवा आरटीओ जवळील सोसायटीतील महिला मंडळा सोबत आलेल्या महिलांनी सांगितले.तर दिल्ली,बिहार,मध्यप्रदेश येथील पर्यटकांनीसुद्धा या थ्रिलिंग बोटिंग राईडचा मनमुराद आनंद मिळल्याचे सांगितले.
जुहू मोरागाव कोळीवाडयातील प्रियांका मांगेला या 20 वर्षाच्या तरुणीने अंधेरी पश्चिम भवन्स महाविद्यालयात कला शाखेत पदवी घेतीली, नंतर दोन वर्षांच्या मास मीडियाची पदवी तीने घेतली. मात्र मासेमारी व्यवसायात आपल्या कुटुंबाची होणारी परवड लक्षात घेता आणि अलिकडेच त्यांच्या मासेमारी साहित्याला समाजकंटकांनी लावलेल्या आगीत सुमारे 4 लाखांचे मोठे आर्थिक नुकसान झालं. खरंतर आर्किटेक्चरकडे जायचे माझे स्वप्न होते. मात्र या पर्यटन पूरक व्यवसायाकडे वळण्याचा आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा मी निर्णय घेतला.
जुहू मोरागाव मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या मोलाच्या सहकार्यामुळेच चौपाटीवर पर्यटकांसाठी थ्रिलींग बोटिंग राईड गेल्या 21 डिसेंबर पासून तिने येथील तरुणांच्या सहकार्याने सुरू केली आहे.या बोटींग राईडला चांगला उस्फूर्त मिळतो.ं "जुहू चौपाटी जायेंगे भेळ पुरी खायेंगे"अस म्हणणाऱ्या आणि येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही थ्रिलिंग बोटिंग राईड ही एक पर्वणी असून चिमुरड्यासह कोटुंबिक आनंद देणारी आहे .या सोसायटीने येथील तरुणांना रोजगार मिकवण्यासाठी ही बोट राईड त्यांना संस्थेने चालवायला दिली आहे. चौपाटीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील समुद्रकिनारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत दोन 16 आसनी फेरी बोटी आणि 6 आसनी मोटार बोटीने पर्यटक 15 ते 20 मिनिटे जुहूच्या समुद्रात फेरफटका मारतात.येथे जेट्टीची सोय नाही. मात्र बोटीत शिरण्यापूर्वी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गळ्यात जॅकेेट घातले जाते,आणि सुरक्षितपणे त्यांना बोटीत चढवल आणि उत्तरवले जाते अशी माहिती प्रियांका मांगेला आणि तिला या व्यवसायात मदत करणारा फुटबॉल कोच वैभव मांगेला यांनी सांगितले.वाढते सागरी प्रदूषण,ओव्हर फिशिंग,डिझेलचे वाढते दर यामुळे मुंबईसह राज्यातील मच्छिमारांना मासळीच्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मासेमारीच्या 8 दिवसांच्या एका ट्रीपला सुमारे 2 लाख रुपये खर्च येतो ,मात्र तेवढ्या प्रमाणात मासळी मिळत नसल्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत.आपल्या कुटुंबाची या व्यवसायात होणारी परवड पाहता आणि आजच्या कोळी समाजातील तरुण पिढी ही शिक्षित असूनही ते बेरोजगार आहेत.त्यामुळे या व्यवसायाला पूरक असलेल्या सागरी पर्यटन व नौकानयन उद्योगातून तरुण वर्गाला रोजगार मिळवून शकतो.
मच्छिमार समाजाच्या अभ्यासक नंदिनी चव्हाण यांनी स्वतः या थ्रिलिंग बोटिंग राईडचा आनंद लुटला. जुहू मोरागाव मच्छिमार संस्थेने जुहू चौपाटीवर सुरू केलेली आणि येथे रोज येणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच आहे. दिवसेंदिवस मच्छिमारांच्या उपजीविकेचे, गावठाणांचे,वाहिवा टीचे प्रश्न गंभीर होत असतांना मासेमारी व्यवसायसला पूरक ठरणांरा हा पर्यटन व्यवसाय आहे.भारतात सागरी किनारपट्टीवर राहणारा पारंपरिक आणि लघुउद्योग करणारा
मच्छिमार समाज हा पर्यटन व्यवसायात पुढे असून सागर किनारपट्टीवर पर्यटनाची धुरा तो यशस्वीपणे सांभाळतो आहे.देशात अन्य सागरी किनारपट्टीवर पर्यटनासाठी सर्व सुविधा आणि योजना 720 किमी सागरी किनाऱ्याचे वरदान लाभलेल्या महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर उपलब्ध नाहीत.पर्यटनासाठी लागणाऱ्या जेट्टी व अन्य सुविधा राज्यातील सागरी किनारपट्टीसह आणि मुंबईची शान असलेल्या चौपाट्यांवर देणे गरजेचे आहे.
जुहू चौपाटीवरील बोटिंग राईड पर्यटनांला देखिल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटनाची जाण असलेले राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि स्थानिक भाजपा आमदार अमित साटम यांनी महत्व दिले पाहिजे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या गिरगाव चौपाटी नंतर आता जुहू चौपाटीवर सुरू झालेली या बोटिंग राईडचा विस्तार वरळी,माहिम, वर्सोवा,मढ,मार्वे आणि गोराई येथे स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने पर्यटकांसाठी बोटिंग राईड सुरू केल्यास आणि त्यांना जेट्टी व सर्व सुविधा दिल्यास त्यांना रोजगार आणि शासनाला महसूल देखिल मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे लवकरच येथे भेट देणार असून या बोटिंग राईडचा आनंद लूटणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.तर शासनातर्फे आपण येथील बोटिंग राईडला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन जानकर यांनी दिले आहे.