शाळांमध्ये गुड टच, बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार

By यदू जोशी | Published: August 22, 2024 05:33 AM2024-08-22T05:33:50+5:302024-08-22T05:34:26+5:30

बदलापूर घटनेनंतर बालकल्याण विभाग म्हणून काय करता येऊ शकेल यावर विचार करण्यासाठी तटकरे यांनी बुधवारी रात्री अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Good touch, bad touch activities will be made mandatory in schools | शाळांमध्ये गुड टच, बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार

शाळांमध्ये गुड टच, बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार

मुंबई : सरकारी, खासगी अशा सर्वच शाळांमध्ये लैंगिकतेसंबंधी जागृती करणारा ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम राबविणे अनिवार्य केले जाईल, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लोकमतला दिली.

मुलांना ‘ते’ कसे ओळखावे हे सांगणे गरजेचे

बदलापूर घटनेनंतर बालकल्याण विभाग म्हणून काय करता येऊ शकेल यावर विचार करण्यासाठी तटकरे यांनी बुधवारी रात्री अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी सांगितले की, शालेय मुलामुलींना एखादी व्यक्ती छेड काढण्यासाठी जवळीक साधत असेल तर ते कसे ओळखावे हे सांगणे गरजेचे आहे.

कोणती व्यक्ती कोणत्या हेतूने त्यांना स्पर्श करत आहे हे त्यांना समजणे आवश्यक आहे. ते समजण्याची क्षमता प्राप्त झाली तर लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळता येऊ शकतात. त्यामुळे ‘गुड टच, बॅड टच’ हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्यासंबंधीचा आदेश शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करून काढण्यात येईल.

Web Title: Good touch, bad touch activities will be made mandatory in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.