Join us

कासवाला आलियाचा अलविदा...

By admin | Published: May 16, 2017 1:00 AM

समुद्रीकासव आणि वन्य जीव संवर्धनाविषयी जनजागृतीकरिता रविवार १४ मे रोजी चित्रपट अभिनेत्री आलिया भटने डहाणूला भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : समुद्रीकासव आणि वन्य जीव संवर्धनाविषयी जनजागृतीकरिता रविवार १४ मे रोजी चित्रपट अभिनेत्री आलिया भटने डहाणूला भेट दिली. पारनाका येथील उपवन संरक्षक कार्यालयात स्लाइड शोद्वारे माहिती घेतल्यानंतर कासव पुनर्वसन केंद्राची तिने पाहणी केली. या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.मुख्य वन संरक्षक ठाणे सुनील लिमये आणि उपवन संरक्षक डहाणू एन. लडकत यांनी पुष्प देऊन आलियाचे स्वागत केले. त्यानंतर, पशुवैद्य दिनेश विन्हेरकर यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून वाइल्डलाइफ कनझरवेशन अँड अनिमल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेचे वन्यजीव संवर्धनातील कार्य, समुद्री कासव व त्यांचे प्रकार या विषयी माहिती घेतली. राज्यातील एकमेव पुनर्वसन केंद्राची पद्धती जवळून पाहिली. स्लाइड शोद्वारे रेस्क्यू करण्यात आलेल्या जखमी वन्य प्राण्यांचे फोटो पाहून, आलिया हळहळली. त्यांच्यावर केंद्रात केलेल्या उपचारानंतर प्राण्यांना सुखरूप अधिवासात सोडल्याचे पाहून ती सुखावलीही. कासवांची पिल्ले समुद्रात पोहताना पाहून ती उल्हासित झाली.