ढोल ताशांच्या गजरात गणरायांना निरोप

By admin | Published: September 9, 2014 11:46 PM2014-09-09T23:46:38+5:302014-09-09T23:46:38+5:30

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असा जयघोष तसेच ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून सोमवारी जिल्ह्याभर बाप्पांना भाविकांनी साश्रुनयनांनी निरोप दिला

Goodbye to the people of Dhol | ढोल ताशांच्या गजरात गणरायांना निरोप

ढोल ताशांच्या गजरात गणरायांना निरोप

Next

ठाणे : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असा जयघोष तसेच ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून सोमवारी जिल्ह्याभर बाप्पांना भाविकांनी साश्रुनयनांनी निरोप दिला. यावेळी विसर्जन घाटांवर अबाल-वृध्दांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुख्य रस्त्यांसह विसर्जनस्थळी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवा-दातिवली येथे विसर्जनासाठी आलेल्या मुंब्य्रातील विशाल राणेचा बुडून मृत्यू झाला.
ठाणे शहर-ग्रामीण आणि पालघर जिल्ह्यात सार्वजनिक आणि घरगुती ३४ हजार ३३० गणरायांना यावेळी निरोप देण्यात आली.ठाणे ग्रामीण भागात १०४ सार्वजनिक तर ४८३ घरगुती तसेच शहरात सुमारे ७४६ सार्वजनिक आणि २७ हजार ४८३ घरगुती तसेच पालघर जिल्ह्यात ४०० सार्वजनिक तर ५ हजार ११४ घरगुती गणरायांना वाजत-गाजत निरोप देण्यात आला आहे. आयुक्तालयातील ठाणे परिमंडळात ७९ सार्वजनिक ५ हजार ९४६ घरगुती, भिवंडीत १३४ सार्वजनिक ३ हजार ९५५ घरगुती, कल्याणात १६९ सार्वजनिक ८हजार १५० घरगुती, उल्हासनगरमध्ये २०४ सार्वजनिक ५ हजार ४५० घरगुती तसेच वागळे इस्टेटमध्ये १६० सार्वजनिक आणि ३ हजार ९८२ घरगुती गणरायांना भावपूर्ण निरोप दिला. टिटवाळा शहरास ग्रामीण भागात दहा दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. पोलिसांनी घाटांवर बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Goodbye to the people of Dhol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.