माल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 07:37 AM2020-10-01T07:37:51+5:302020-10-01T07:38:08+5:30
दीपिका, करिश्माचा जबाब : आता एनसीबी अन्य पुरावे गोळा करण्याच्या मागे
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिष्मा प्रकाश यांनी ‘ते’ व्हॉट्सअॅप चॅट मान्य केले असले, तरी त्यामध्ये वापरलेले कोडवर्ड हे विविध प्रकारच्या सिगारेटसाठी वापरले होते, असे जबाबात सांगितले आहे. ड्रग्ज रॅकेटप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ८ सप्टेंबरला अटक झाली तर दीपिका, सारा खान, श्रद्धा कपूर, रुकुल प्रीत सिंह यांची शनिवारी चौकशी झाली.
दीपिका व तिची मॅनेजर करिष्मा यांच्यात २८ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या चॅटमध्ये ‘माल’, ‘वीड’, ‘हॅश’ व ‘डोब’ असा उल्लेख होता. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केली. त्यांनी चॅट मान्य केले. मात्र, सिगारेटच्या प्रकारासाठी हे शब्द वापरले होते, असे सांगितले. त्यामुळे एनसीबी ते शब्द गांजा, चरससाठीच वापरले होते, हे सिद्ध करण्यासाठी अन्य पुरावे शोधत आहेत. त्यासाठी व्हॉट्सअॅप चॅट व बँक व्यवहाराबाबत माहिती घेत आहेत.
पूर्ण तयारीनिशीच आल्या
दीपिका व करिष्मा यांच्या स्वतंत्रपणे नोंदविलेल्या जबाबात बहुतांश उत्तरे सारखी आहेत. त्यामुळे चौकशीला येण्यापूर्वी त्या पूर्ण तयारी करून आल्याचे स्पष्ट होते, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
अनुराग यांची आज चौकशी
लैंगिक अत्याचारप्रकरणी पायल घोषने दाखल केलेल्या तक्रारीनुसार चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांना पोलिसांनी समन्स बजावले. गुरुवारी चौकशीस त्यांना वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल. वृत्त/३