Sharad Pawar : कार्यकर्त्यांच्या सदिच्छांनी बळ मिळाले, शरद पवारांनी मोदींचेही आभार मानले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 08:33 AM2021-03-30T08:33:39+5:302021-03-30T09:13:28+5:30

शरद पवार यांच्या आठवणी फेसबुकवरुन जागवल्या. तर, गावागावातील कार्यकर्ता साहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करु लागला. त्यामुळे, या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींचे शरद पवार यांनी आभार मानले आहेत.

The goodwill of the workers gave strength, Sharad Pawar also thanked Modi | Sharad Pawar : कार्यकर्त्यांच्या सदिच्छांनी बळ मिळाले, शरद पवारांनी मोदींचेही आभार मानले

Sharad Pawar : कार्यकर्त्यांच्या सदिच्छांनी बळ मिळाले, शरद पवारांनी मोदींचेही आभार मानले

Next
ठळक मुद्देशरद पवार यांना पुन्हा बुधवार, ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, एण्डोस्कोपी व शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. पवार यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासण्या केल्यानंतर पित्ताशयाच्या विकाराचे निदान झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. त्यानंतर, देशभरातून शरद पवार यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेकांनी काळजी व्यक्त करत, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांनीही या सर्वांचे आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही त्यांनी आभार मानले. 

शरद पवार यांना पुन्हा बुधवार, ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, एण्डोस्कोपी व शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली. त्यानंतर, सोशल मीडियातून शरद पवारांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. अनेकांनी, शरद पवार यांच्या आठवणी फेसबुकवरुन जागवल्या. तर, गावागावातील कार्यकर्ता साहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करु लागला. त्यामुळे, या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींचे शरद पवार यांनी आभार मानले आहेत. ''माझे सर्व सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मित्रमंडळींनी व सुहृदांनी आवर्जून तब्येतीच्या चौकशीसाठी फोन केले, संदेश ठेवले, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांचे बळ मिळाले. मनपूर्वक धन्यवाद !, असे ट्विट पवार यांनी केलंय. 

शरद पवार यांच्या प्रकृतीची दिल्लीती दिग्गज नेत्यांनीही विचारपूस केली. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांसह अनेक दिग्गजांचे पवार यांनी ट्विटरवरुन आभार मानले आहेत. दरम्यान, पुढील दोन आठवड्यांसाठी शरद पवार यांचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्या त्यांच्यावर एण्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात येईल. 

पश्चिम बंगाल दौरा रद्द

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पवार बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. तो कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. केरळमध्येही पवार प्रचार दौरे करणार होते. मात्र, आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व निवडणूक प्रचार दौरे आणि नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पवार यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा दिल्या. 

दिग्गजांकडून विचारपूस

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फोनवर विचारपूस केल्याचे पवार यांनी ट्विटरवर सांगितले. भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रकृतीची विचारपूस केली. या सदिच्छांबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे, असे पवार यांनी म्हटले. लवकर बरे व्हावे अशी भावना व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पवार यांनी आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, निर्मला सीतारमन यांनी विचारपूस केल्याचेही पवार यांनी ट्विट करून सांगितले.

Web Title: The goodwill of the workers gave strength, Sharad Pawar also thanked Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.