कमलादेवी चट्टोपाध्याय यांना डुडलद्वारे आदरांजली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 08:49 AM2018-04-03T08:49:46+5:302018-04-03T08:54:54+5:30

समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या 115व्या जयंतीनिमित्त गुगलनं डुडलद्वारे त्यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली वाहिली आहे.

google doodle marks kamaladevi chattopadhyays 115th birth anniversary | कमलादेवी चट्टोपाध्याय यांना डुडलद्वारे आदरांजली 

कमलादेवी चट्टोपाध्याय यांना डुडलद्वारे आदरांजली 

Next

मुंबई - समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या 115व्या जयंतीनिमित्त गुगलनं डुडलद्वारे त्यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली वाहिली आहे. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म 3 एप्रिल 1903 रोजी झाला होता. 'Kamaladevi Chattopadhyay's 115th Birthday'  या शीर्षकांर्तगत गुगलनं डुडल साकारुन कमलादेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये चट्टोपाध्याय यांनी केलेल्या कार्याची झलकही पाहायला मिळत आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कमलादेवी यांनी रंगभूमी व हातमागावरील उद्योगक्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. समाजात शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.

कलमादेवी चट्टोपाध्याय यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारतात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, संगीत नाटक अकॅडमी, सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज इम्पोरियम आणि क्राफ्ट काऊंसिल ऑफ इंडिया या कला प्रदर्शनासंबंधित संस्था पाहायला मिळत आहेत.

कमलादेवींचा झाला होता बालविवाह 
कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म मंगळुरू (कर्नाटक) येथे झाला होता. त्यांचे वडील मंगळुरूचे जिल्हाधिकारी होते. कमलादेवी केवळ सात वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कमलादेवी यांचे वयाच्या 14 व्या वर्षी विवाह झाला. लग्नाच्या 2 वर्षांनंतर त्यांचे पती कृष्ण राव यांचे निधन झाले.  चेन्नईच्या क्वीन मेरीज कॉलेजमध्ये शिक्षण  घेत असताना सरोजिनी नायडू यांच्या छोट्या बहिणीसोबत त्यांची भेट झाली. त्यांनी कमलादेवी व भाऊ हरेंद्र नाथ चट्टोपाध्याय यांची गाठभेट घालून दिली. भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली व दोघं विवाहबंधनात अडकले. पुर्नविवाहमुळे त्यांना ब-याच अडचणींचा सामना करावा लागला, मात्र लोकांच्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

Web Title: google doodle marks kamaladevi chattopadhyays 115th birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल