Google Doodle : 'महाराष्ट्र भूषण' पु. ल. देशपांडेंना Google चा मानाचा मुजरा; खास Doodle पाहिलंत का?
By बाळकृष्ण परब | Updated: November 8, 2020 11:40 IST2020-11-08T10:00:19+5:302020-11-08T11:40:58+5:30
Google Doodle celebrates 101st birth anniversary of Pu La Deshpande : गुगलकडून प्रत्येक दिनविशेषानिमित्त विशेष डुडल प्रसिद्ध करण्यात येत असते. दरम्यान, आज पुलंचे डुडल शेअर करून गुगलने पुलंना मानवंदना दिली आहे.

Google Doodle : 'महाराष्ट्र भूषण' पु. ल. देशपांडेंना Google चा मानाचा मुजरा; खास Doodle पाहिलंत का?
मुंबई - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे Pu La Deshpande यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त पुलंच्या आठवणींना विविध माध्यमातून उजाळा देण्यात येत आहे. गुगलनेहीपु. ल. देशपांडे यांना मानाचा मुजरा केला आहे. गुगलने आपल्या होमपेजवर पुलंचा फोटो असलेले डुडल शेअर केले आहे.
गुगलकडून प्रत्येक दिनविशेषानिमित्त विशेष डुडल प्रसिद्ध करण्यात येत असते. दरम्यान, आज पुलंचे डुडल Doodle शेअर करून गुगलने Google पुलंना मानवंदना दिली आहे. या डुडलमध्ये पुलं हे पेटी वाजवताना दिसत आहेत. पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईत झाला होता. त्यांनी मराठी साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा विविध क्षेत्रात आपल्या कौशल्याची छाप पाडली होती.
पुलंची व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक, गोळाबेरीज, असा मी असामी, अपूर्वाई, पूर्वरंग आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच पुलंनी गुळाचा गणपती, वंदे मातरम, दूधभात आदी चित्रपटात काम केले होते.
पुलंनी आकाशवाी आणि दूरदर्शनवरही काम केले होते. ते १९५५ मध्ये आकाशवाणीमध्ये कामाला लागले होते. १९५९ मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले होते. तसेच दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. पुलंच्या साहित्यावर आधारित मालिका आणि चित्रपट निघाले आहेत.