Join us

‘त्या’ चिमुकल्यासाठी गोपाळ चौहान ठरले देवदूत!

By admin | Published: December 23, 2015 12:32 AM

आईच्या भेटीच्या ओढीपायी रूळावर उडी टाकणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाला स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचविणाऱ्या अवलियाचा शोध लागला आहे.

पंकज पाटील,  अंबरनाथआईच्या भेटीच्या ओढीपायी रूळावर उडी टाकणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाला स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचविणाऱ्या अवलियाचा शोध लागला आहे. गोपाळ चौहान असे त्यांचे नाव असून त्या लहानग्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी तो देवदूत ठरला आहे. बदलापूरच्या बिस्कीट कंपनीत ते सेल्समनचे काम करतात. त्यांच्या या धाडसाची माहिती समजताच मित्र-नातलगांसह अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या प्रसंगाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झाला होता. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या चिमुकल्याला वाचविणाऱ्या देवदुताचा शोध सुरू केला. गेले दोन दिवस पडद्याआड असणारे चौहान मंगळवारी सायंकाळी सर्वांसमोर आले. ते सांगत होते, नेहमीच्या कामानिमित्त रविवारी मी अंबरनाथला आलो होतो. काम आटोपल्यावर उल्हासनगरला जाण्यासाठी स्टेशनवर आलो. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लोकल असल्याने शेवटचा डबा पकडण्यासाठी मागेच उभा राहिलो. लोकल येत असल्याची घोषणा झाली आणि काही क्षणात भरधाव वेगाने येणाऱ्या लोकलचा वळणावर हॉर्नही वाजला. तेवढ्यात मला समोरच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून धावत येणारा पाच वर्षांचा मुलगा दिसला. आरडाओरडा करुन त्याला रोखण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला. पण या गडबडीत तो मुलगा ट्रॅकवरच येऊन उभा राहिला. ट्रेन आणि मुलामधील अंतर कमी असल्याने त्याला माघारी फिरणे शक्यच नव्हते. या मुलाचा जीव जाणार या भीतीने कोणाच्याही मदतीची वाट न पाहता मी त्या मुलाला प्लॅटफॉर्मवर ओढण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात तो मुलगा हातातुन निसटला. पण ट्रेन खूप जवळ आल्याचे पाहून मी त्याला घट्ट पकडले. घाबरलेल्या मुलानेही मला धरून ठेवले. गुडघ्यावर बसून पूर्ण जोर लावत मी त्याला वर ओढले. त्याचवेळी आणखी एका प्रवाशाने हात दिला. मुलगा सुखरुप वाचल्याचे पाहून मला बरे वाटले. लगेचच ती टे्रन पकडून मी तेथून निघून गेलो. मी त्या क्षणी केलेले धाडस किती मोलाचे ठरले, ते मला रात्री टीव्ही आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांतील बातमीतून कळले. हा प्रकार मी घरीही सांगितला. माझी पत्नी आणि दोन्ही मुलींनाही मुलगा वाचल्याचे समजल्यावर खूप आनंद झाला, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. पण ------