मुंबई-मालवणीतील एका सभेदरम्यान उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चनांनी स्वातंत्र्यलढ्यात कोणतंही योगदान दिले नसल्याचे वक्तव्य केले होते. मात्र या आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असून ख्रिश्चनांच्या भावना दुखावण्याचा आपला काडीमात्र उद्देश नव्हता, हे सर्व काँग्रेसचे षढयंत्र आहे अशी ठाम भूमिका खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले. उलट आपण याबाबतीत ख्रिश्चन समाजाशी चर्चेची तयारी देखिल दाखवली असून आपली भूमिका त्यांच्या भावना दुखावण्याचा नव्हत्या हे समाज बांधवांना पटवून देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण सर्व जाती धर्माचा नेहमीच आदर करत असून मालवणी येथे आपण मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी 5 एकर जागा मिळवून देण्यासाठी आपण सातय्याने प्रयत्न केले होते. त्यानिमित्त या कार्यक्रमात हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ना एकट्या हिंदू धर्माचे योगदान होते ना एकट्या मुस्लिम समाजाचे योगदान होते,संपूर्ण हिंदुस्थानी नागरिकांचे योगदान होते असे वक्तव्य मौलविनी केले होते. या कार्यक्रमात ख्रिस्ती व सर्व बांधव देखिल होते. त्यामुळे मौलविनच्या भाषणाचा धागा पकडून आपण हे वक्तव्य केले मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला अशी भूमिका त्यांनी विषद केली.
आपल्याला ही लढाई एकट्याला लढायची असल्यामुळे आपण पक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी देखिल दर्शवली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानव,मुंबई अध्यक्ष व आमदार अँड.आशिष शेलार यांनी आपल्याशी फोन वरून चर्चा केली होती.तर भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी आपली कार्यालयात भेट घेतली.हे सर्व काँग्रेसचे षढयंत्र असून आपण राजिनामा देऊन एकट्याने ही लढाई लढू नका, भाजपा विरोधात काँगस अशी ही लढाई असून पक्ष तुमच्यामागे खंबीरपणे उभा असल्याचा दिलासा या मान्यवरांनी आपल्याला दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.