Join us

Gopichand Padalkar: उद्धव ठाकरे स्टाईल कानपिचक्या घेत पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र; ६ वेळा केला 'किंबहुना' शब्दाचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 2:30 PM

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवार यांनाही पत्र लिहून जोरदार टोलेबाजी केली आहे.

Gopichand Padalkar Letter to Vijay Wadettiwar: ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ओबीसी आरक्षण उपसमिती हरवली असून ती शोधण्यासाठी टास्कफोर्सची स्थापना करण्याची मागणी करत खोचक टोला लगावला होता. त्यावर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत पडळकर नुकतंच उगवलेलं गवत असल्याचं म्हटलं होतं. आता गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवार यांनाही पत्र लिहून जोरदार टोलेबाजी केली आहे. पडळकरांनी लिहिलेल्या पत्रात जाणीवपूर्वक 'किंबहुना' या शब्दाचा प्रयोग वारंवार करण्यात आला आहे. 

"मी मुख्यमंत्र्यांना हरवलेली मंत्रीमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्कफोर्सचं गठन करण्याची मागणी केल्यानंतर 'निष्क्रीय दिग्गजांच्या मंत्रीमंडळ उपसमिती'मधून एका तरी मंत्र्याला जाग आली बरं आहे. किंबहूना,आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या 'महाज्योतीचे'  अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते", असा टोला पडळकरांनी पत्रातून लगावला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवारांना लिहिलेलं पत्र

प्रति, अतिमाननीय, विजय वडेट्टीवारइतर मागास बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र. 

महोदय, 

मी मुख्यमंत्र्यांना हरवलेली मंत्रीमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्कफोर्सचं गठन करण्याची मागणी केल्यानंतर ‘निष्क्रीय दिग्गजांच्या मंत्रीमंडळ उपसमिती’मधून एका तरी मंत्र्याला जाग आली बरं आहे. किंबहुना,आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’  अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते.

किंबहुना, आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’  अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते.

किंबहूना मला आपल्यासारखे दहावी पास असतानासुद्धा उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याकरिता खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट प्राप्त करता आले नसते.

किंबहुना आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या गोसखुर्द प्रकल्पात  कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंड्स्टॅडींग न झाल्याने त्यांच्याविरूद्ध तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता. किंबहुना आपल्यासारख्या दूरदृष्टीने स्वकीयांसाठी छत्तीसगडमध्ये आधी दारूची फॅक्टरी विकत घेऊन मगच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत चंद्रपूरमधूल दारूबंदी उठवता आली नसती.

किंबहुना दारूबंदीनंतर २३ लिकर शॅाप्सला भागीदारीने चंद्रपूरला स्थलांतरीत करता आले नसते. किंबहूना नागपूरला डिलरशीप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना फक्त तेथूनच दारू विकत घेण्याची अट घालता आली नसती. किंबहुना म्हणूनच मी आपल्या या अफाट कर्तृत्वापुढे आपल्या दृष्टीने अज्ञानी बालक असेल..

मला गवताची उपमा देण्याआधी आपण कधी पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीशी  ‘स्वआकलन’ केले आहे का?  असो आपण आपली भाषा प्रस्थापितांच्या विरोधात वापरली असती तर ओबीसी समाजाच्या हिताचे कल्याण झाले असते, असं प्रत्त्युत्तर पडळकरांनी वडेट्टीवारांना दिलं आहे.

जय मल्हार!

टॅग्स :गोपीचंद पडळकरविजय वडेट्टीवारओबीसी आरक्षणउद्धव ठाकरे