"शकुनी काकांचा कोटीची बँक आणि त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव", शरद पवारांवर गोपिचंद पडळकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 10:05 AM2022-04-28T10:05:41+5:302022-04-28T10:06:33+5:30

Gopichand Padalkar Criticize Sharad Pawar: गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीवर नेहमीच सडकून टीका करत असतात. त्यामध्ये पुन्हा एकदा एसटी बँकांच्या निवडणुका निमित्त शरद पवारांना टोला लगावत, पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे.

Gopichand Padalkar's accusation against Sharad Pawar | "शकुनी काकांचा कोटीची बँक आणि त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव", शरद पवारांवर गोपिचंद पडळकरांचा आरोप

"शकुनी काकांचा कोटीची बँक आणि त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव", शरद पवारांवर गोपिचंद पडळकरांचा आरोप

googlenewsNext

- अल्पेश करकरे

मुंबई - भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी हा वाद  नवीन नाही. गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीवर नेहमीच सडकून टीका करत असतात. त्यामध्ये पुन्हा एकदा एसटी बँकांच्या निवडणुका निमित्त शरद पवारांना टोला लगावत, पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. शकुनी काकांचा कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आहे असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर यांनी एसटी  बँक निवडणुकांच्या निमित्ताने म्हटले आहे की,मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय. बँकेची निवडणूक घोषीत केलीये आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढलाय.

साहजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते  तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही. १९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून दिली.  आणि सभासद फीस नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये वसूल केले. त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली ५०० रूपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त  रक्कम ,अशा वेगवेगळ्या मार्गानं जवळपास १०० कोटी रूपये गिळंकृत केले.  त्यातूनच  वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या आलीशान गाड्या खरेदी करून दिल्या असे पडळकर यांनी म्हटले आहे.

पुढे पडळकर म्हणाले की,  ज्यावेळेस एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावरती लढा देत होतो. त्यावेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीखातीर आपल्या  सिल्वर ओकवरून एक वेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी सुद्धा पाठवलं  नाही. जरा तरी यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर यांनी त्या १३५ विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती. अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत.

Web Title: Gopichand Padalkar's accusation against Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.