मुंबई : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्याबाबतचा आदेश राज्य शासनाने शुक्रवारी काढला.
मुंडे हे ऊसतोड कामगारांचे नेते होते. त्यामुळे या कामगारांच्या कल्याणासाठी होत असलेल्या महामंडळास शासनाने त्यांचे नाव दिले आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार केशवराव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील १०१ सहकारी क्षेत्रातील आणि ८७ खासगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये आजमितीस अंदाजे आठ लाख ऊसतोड कामगार आहेत.बहुतांश कामगार हे मराठवाड्यातील असून त्यातही मूळ बीड जिल्ह्यातील असलेल्या कामगारांची संख्या अधिक आहे. विविध जिल्ह्यांमध्ये ते स्थलांतरित झालेले आहेत.
सावकारी कर्जमाफीचा आदेश अखेर निघालासावकारांनी त्यांच्या परवाना क्षेत्राबाहेर शेतकऱ्यांना दिलेले कर्ज, त्यावरील व्याज माफ करण्याबाबतचा आदेश सहकार विभागाने शुक्रवारी काढला. राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज त्यामुळे माफ होईल. सावकारांची कर्ज, व्याजाची रक्कम राज्य शासन भरणार आहे. या निर्णयाचा फायदा मुख्यत्वे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकºयांना होईल. या योजनेच्या अटी सावकारांनी त्यांच्या क्षेत्रात दिलेल्या कर्जाच्या माफीप्रमाणेच असतील. या योजनेची अंमलबजावणी ३१ मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.