गावठाणातील घरांना मिळणार संरक्षण - गोपाळ शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 07:16 AM2018-03-10T07:16:28+5:302018-03-10T07:16:28+5:30

गावठाणातील घरांना संरक्षण देण्याचे आदेश उपनगर पालक मंत्री तथा शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याची माहिती उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली. येथील मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार शेट्टी आणि मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली.

 Gopthan's house protection - Gopal Shetty | गावठाणातील घरांना मिळणार संरक्षण - गोपाळ शेट्टी

गावठाणातील घरांना मिळणार संरक्षण - गोपाळ शेट्टी

googlenewsNext

मुंबई - गावठाणातील घरांना संरक्षण देण्याचे आदेश उपनगर पालक मंत्री तथा शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याची माहिती उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली. येथील मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार शेट्टी आणि मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. गावठाण व कोळीवाड्यामधील सद्य:स्थितीत असलेल्या घरांना
संरक्षण देत स्थानिकांना राहती घरे दुरुस्त करणे व दुमजली करण्यासाठी कायदेशीर परवानग्या देण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी दिल्या, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.

या बैठकीला मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, भाजपा खासदार गोपाळ शेट्टी, भाजपा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष विनोद शेलार, महाराष्ट्र मच्छीमार संघर्ष समितीचे सरचिटणीस किरण कोळी, कोळी समाजाचे नेते सुनील कोळी, संजय सुतार, भाजपा उत्तर मुंबई उपाध्यक्ष युनूस खान आदी उपस्थित होते.

लवकरच पुलांचे सर्वेक्षण
खासदार शेट्टी यांनी सुचविल्याप्रमाणे, मेरीटाइम बोर्डाने स्थायी समितीमध्ये मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार लवकरात लवकर पुलांचे सर्वेक्षण करून अहवाल महानगरपालिकेला देण्याबाबत पालकमंत्र्यांनी आदेश दिला आहे.
मढ, कोळीवाडा भागातील पाण्याचा दाब वाढविण्याकरिता पंप बसविण्यासाठी विलंब होत असल्यामुळे शेट्टी यांनी पंपाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेत महापालिकेच्या मदतीने संपूर्ण मढ कोळीवाड्यात पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधार करण्याचे आश्वासन दिले.
तळपशा बंदराच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या समुद्रकिनाºयांवरील मंजूर झालेल्या कामांची सुरुवात प्राधान्याने करण्यात येईल, असा आदेश महादेव जानकर यांनी प्रशासनास दिला.

‘राहती घरे तोडू नका’
कोळीवाडे तथा गावठाणमधील अस्तित्वात असलेल्या घरांना दुरुस्तीसाठी परवानगी देण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला अंतिम मंजुरी मिळेपर्यंत सद्य:स्थितीत राहती घरे न तोडण्याचे आदेश संबंधित महापालिका प्रशासनास देण्यात आले. मच्छीमार आपल्या घराजवळील समुद्रालगतच्या जागा मासळी सुकविण्यासाठी वापरतात.
महापालिका अधिकारी त्या मच्छीमारांवर कारवाई करतात. त्यामुळे मासळी सुकविण्याच्या जागा मच्छीमार सोसायट्यांच्या नावावर कराव्यात, या किरण कोळी यांच्या मागणीसंदर्भात महसूल खात्याशी चर्चा करून हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले.
जोपर्यंत या सर्व समस्या-मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत कायमस्वरूपी बांधकाम न करण्याच्या अटीवर मच्छीमारांना मासळी सुकविण्यासाठी समुद्रालगतच्या जागा वापरण्याची सूट द्यावी, अशी सूचना मंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना दिली.

Web Title:  Gopthan's house protection - Gopal Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.