गोराई रिक्षा स्टँडजवळील नाल्यावर नव्याने उभारलेल्या अनधिकृत बांधकामामुळे गोराईला नदीचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 11:07 PM2018-07-09T23:07:12+5:302018-07-09T23:09:56+5:30

बोरिवली पश्चिम गोराई खाडी पलिकडे असलेल्या गोराई गावातील गोराई रिक्षा स्टँडजवळील नाल्यावर नव्याने उभारलेल्या अनधिकृत बांधकामामुळे गोराई गावातील वारीला तलाव परिसराला नदीचे स्वरूप आले.

Goraiya river pattern due to the newly constructed unauthorized construction of the nearby Gorai rickshaw stand | गोराई रिक्षा स्टँडजवळील नाल्यावर नव्याने उभारलेल्या अनधिकृत बांधकामामुळे गोराईला नदीचे स्वरूप

गोराई रिक्षा स्टँडजवळील नाल्यावर नव्याने उभारलेल्या अनधिकृत बांधकामामुळे गोराईला नदीचे स्वरूप

Next

मुंबई- बोरिवली पश्चिम गोराई खाडी पलिकडे असलेल्या गोराई गावातील गोराई रिक्षा स्टँडजवळील नाल्यावर नव्याने उभारलेल्या अनधिकृत बांधकामामुळे गोराई गावातील वारीला तलाव परिसराला नदीचे स्वरूप आले असून गोराईकरांच्या शेतीचे झाले मोठे नुकसान झाले आहे.
येथील नाल्यावर नव्याने उभारलेल्या अनधिकृत बांधकामामुळे येथे 3 ते 4 फूट तुंबले पाणी तुंबले आहे.परिणामी गोराईकरांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील रिक्षा स्टँड जवळील नाल्यावर सुमारे 8 ते 10 पक्की अनधिकृत घरे गेल्या 8 ते 9 महिन्यांपूर्वी बांधण्यात आली. परिणामी येथील डोंगरातून येणारे आणि नाल्यातून समुद्रात जाणारे पाणी जाण्याचा मार्गच या अनाधिकृत बांधकामामुळे बंद झाला आहे.त्यामुळे प्रथमच गेल्या 40 वर्षात येथे मोठया प्रमाणात पाणी तुंबल्यामुळे आमच्या शेतीवाडीचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.
याबाबत पालिकेच्या आर मध्य विभागाने फक्त येथील दोनच अनाधिकृत बांधकामांवर हातोडा मारला.

मात्र उर्वरित बांधकामा कडे कांना डोळा केला अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. पालिकेने येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यास पावसाळ्यात येथील नागरिकांना पूरजन्य परिस्थितीचा सामना करावा लागेल अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली. येथे आनंद यांनी सुमारे 8 व शालू याने 6 पक्की अनधिकृत घरे गेल्या 8 ते 9 महिन्यांपूर्वी बांधली होती.याबाबत पालिकेच्या आर मध्य विभागाने फक्त येथील दोनच अनाधिकृत बांधकामांवर हातोडा मारला,मात्र उर्वरित बांधकामा कडे कांना डोळा केला अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. याप्रकरणी आर मध्य विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितले की,आपण याबाबत माहिती घेऊन कारवाई करू असे त्यांनी सांगितले.

Web Title: Goraiya river pattern due to the newly constructed unauthorized construction of the nearby Gorai rickshaw stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.