पूर्व पश्चिमेला जोडणारा गोरेगांव-मुलूंड लिंक रोड महत्वाचा प्रकल्प; आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 08:06 PM2022-04-14T20:06:27+5:302022-04-14T20:07:30+5:30

मुंबई महानगरपालिकेकडून बांधण्यात येणाऱ्या गोरेगांव-मुलूंड लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन वाघेश्वरी मंदिरासमोर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

goregaon mulund link road important project connecting east to west aditya thackeray did bhumi pujan | पूर्व पश्चिमेला जोडणारा गोरेगांव-मुलूंड लिंक रोड महत्वाचा प्रकल्प; आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

पूर्व पश्चिमेला जोडणारा गोरेगांव-मुलूंड लिंक रोड महत्वाचा प्रकल्प; आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-गोरेगांव-मुलूंड लिंक रोड हा पूर्व व पश्चिमेला जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.मुंबईत ,न्यूयॉर्क मध्ये वेळेला महत्व आहे.किती किमी अंतर आहे,त्यापेक्षा हे अंतर किती कमी वेळात पार केले जाईल याला महत्व आहे.पश्चिम उपनगरात  लोकसंख्या वाढत आहे.त्यामुळे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी साठी गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पात  दोन्ही कडून रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे.या प्रकल्पात सायकल ट्रॅक, फुटपाथ या रस्त्यांवर असेल. येथे 4 किमीचा भोगदा केला जाईल,हा प्रकल्प रेकॉर्ड ब्रेकिंग वेळेत पूर्ण होईल असा विश्वास युवासेनाप्रमुख, पर्यटक, पर्यावरण व राज्यशिष्ठाचार मंत्री, पालकमंत्री- मुंबई उपनगर आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबई महानगरपालिकेकडून बांधण्यात येणाऱ्या गोरेगांव-मुलूंड लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन आज   जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, वाघेश्वरी मंदिर समोर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर संभाव्य वाहतूकीसाठी दिंडोशी सत्र न्यायालय ते संतोष नगर असा 1.26 किमीचा सहा पदरी हा उड्डाण पूल आहे.हा उड्डाण पूल 7 चौकांवरून जाणार आहे. दिंडोशी बसडेपो जवळ पादचारी पूल स्वयंचलित जिन्यासह प्रस्तावित आहे.गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्प' हा महानगरपालिकेने हाती घेतलेला महत्त्वाचा प्रकल्प असून या जोडरस्त्याने मुंबई उपनगरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा चौथा जोडरस्ता उपलब्ध होणार आहे. सदर जोडरस्त्याची लांबी १२.२ किलोमीटर असून पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व) येथील ओबेरोय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड (पूर्व) येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा जोडरस्ता असणार आहे.

यावेळी शिवसेना नेते व स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर,दिंडोशीचे आमदार,विभागप्रमुख सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर,अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू,माजी उपमहापौ अँड.सुहास वाडकर, महिला विभागसंघटक व माजी नगरसेविका साधना माने,माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे,पालिका उपायुक्त परिमंडळ 4 विजय बालमवार, उपायुक्त ( पायाभूत सुविधा) उल्हास महाले,पी दक्षिण वॉर्डचे साहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे,व इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की,गोरेगांव-मुलूंड लिंक रोड हा पूर्व व पश्चिमेला जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.मुंबई ,न्यूयॉर्क मध्ये वेळेला महत्व आहे. किती किमी अंतर आहे,त्यापेक्षा हे अंतर किती कमी वेळात पार केले जाईल याला महत्व आहे.पश्चिम उपनगरात  लोकसंख्या वाढत आहे.त्यामुळे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीसाठी गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पात  दोन्ही कडून रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे.या प्रकल्पात सायकल ट्रॅक, फुटपाथ या रस्त्यांवर असेल. येथे 4 किमीचा भोगदा केला जाईल,हा प्रकल्प रेकॉर्ड ब्रेकिंग वेळेत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शाश्वत विकासावर आमचा भर असून संजय गांधी नॅशनल पार्क मधील एकही झाड तोडले जाणार नाही.तापमान वाढत आहे,आज  सकाळी 6.30 वाजता 29 डिग्री तापमान होते. मुंबईत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.जंगल घोषित झालेले आरे हे एकमेव उदाहरण आहे. यावेळी पत्रकारांशी बोलतांना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की,भोंग्यांचे राजकारण करण्यापेक्षा भोंग्यातून महागाई कशी वाढली,पेट्रोल,डिझेल वाढ कशी झाली हे सांगावे अश्या शब्दात  मनसे व भाजपला त्यांनी टोला लगावला.

मुंबई नालेसफाईवर आमचे लक्ष आहे.मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत.मोगरा,माहुल पंपिंग स्टेशनचे याचे काम केले जात आहे.एका दिवास्तव जर रेकॉर्ड ब्रेकिंग पाऊस झाला तर पाणी तुंबणार नाही हे सांगता येणे कठीण आहे.100 किंवा 50 मिमी पाऊस असेल तर पाणी तुंबणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे.ढगफुटी झाली तर पाणी तुंबणार मी इतर राजकीय पक्षांप्रमाणे पाणी तुंबणार नाही असे बोलणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

वरळी वरून कलानगरच्या कामांवर फोकस विरोधक करत आहेत असे विचारले असता,विकास कामांवर विरोधकांनी फोकस करावे.राजकारण करण्यापेक्षा सहकार्य करावे हे अपेक्षित आहे असा टोला त्यांनी लगावला. 

खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यामुळे जसा मुंबईतील नागरिकांना फायदा होणार आहे, तसाच विदर्भ कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांना देखील भविष्यात गाडी पकडण्यासाठी वळसा घालण्याची गरज पडणार नाही व तुलनेने कमी वेळात आपल्या गावी पोहोचता येईल.

आमदार सुनील प्रभू यांनी गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतानाच त्यामुळे नागरिकांना उपलब्ध झालेल्या विविध सेवा-सुविधांचा आवर्जून उल्लेख केला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळेच दिंडोशीचा विकास शक्य झाला. येथील म्हाडाच्या भूखंडावर ओलिम्पिकच्या धर्तीवर जलतरण तलाव बांधण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
 

Web Title: goregaon mulund link road important project connecting east to west aditya thackeray did bhumi pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.