महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, गोरेगाव पोलिसांनी एकाला केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:50 AM2017-10-13T02:50:15+5:302017-10-13T02:50:27+5:30
गोरेगावमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : गोरेगावमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहरूख के (१९) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पीडित १७ वर्षांची मुलगी क्षमा (नावात बदल) ही भगतसिंगनगर परिसरात राहते. गोरेगावच्या एका नामांकित महाविद्यालयात ती इयत्ता बारावीच्या वर्गात शिकते. तिच्याच शेजारी शाहरूखची बहीण राहते. जिच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. त्याचवेळी त्याने क्षमाला पाहिले आणि तिचा पाठलाग करू लागला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. गेल्या महिनाभरापासून हे सर्व सुरू होते. मात्र क्षमा त्याला दाद देत नव्हती. बुधवारी मात्र ती कॉलेजमधून तिच्या मैत्रिणीसोबत निघाली तेव्हा शाहरूखने तिचा हात धरत तिला सोबत येण्यास सांगितले. मात्र तिने त्याला पुन्हा नकार देत सरळ घरचा रस्ता धरला; आणि घरी जाऊन घडला प्रकार पालकांना सांगितला. तेव्हा तिच्या घरच्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच मालवणीत राहणाºया शाहरूखला गोरेगाव अटक केली.