Join us

महाराष्ट्र दिनानिमित्त वर्सोव्यात निघाली भव्य शोभा यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 8:40 PM

वर्सोवा येथे शिवसेना व युवासेना व स्वप्नाक्षय मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

 मुंबई - वर्सोवा येथे शिवसेना व युवासेना व स्वप्नाक्षय मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली.पालिकेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र(बाळा) आंबेरकर व सजीव कल्ले यांनी या शोभयात्रेचे आयोजन केले आहे.यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते व विभागप्रमुख अँड.अनिल परब,माजी स्थयी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश)फणसे, देवेंद्र आंबेरकर,उपविभागप्रमुख राजेश शेट्ये व विष्णू कोरगांवकर,शाखाप्रमुख अनिल राऊत,संजीव कल्ले, राजेश ढेरे,अशोक मोरे आदी मान्यवर आणि येथील हजारो नागरिक व महिला उपस्थित होत्या.

 आज सकाळी 9 वाजता वर्सोवा मेट्रो स्थानका जवळील चाचा नेहरू उद्यानावरून,वर्सोवा लिंक रोड, बॉन बॉन,जेपी रोड,सात बंगला,वर्सोवा कोळीवाडा,यारी रोड या मार्गे ही शोभा यात्रा निघाली आणि चाचा नेहरू उद्यान येथे दुपारी 12.30 वाजता समाप्त झाली अशी माहिती देवेंद्र आंबेरकर यांनी दिली.

या शोभायात्रेत 700  मेगा बाईक रॅली हे या शोभा यात्रेचे आकर्षण होते.या शोभा यात्रेत महाराष्टाची महती सांगणारी कोळी गीते व नृत्य,50 जणांच्या समूहाने सादर केलेले लेझिम,70 जणांच्या समूहाचे ढोल पथक,लाठीकाठी,तलवारबाजी,वारकरी भजन,मंगळागौर,भव्य रांगोळी आदी विविध कला यावेळी सादर करणार आल्या अशी माहिती शाखाप्रमुख अनिल राऊत यांनी दिली.

या भव्य शोभायात्रेनिमित्त प्लास्टिकचा वापर टाळा व पर्यावरणाचे रक्षण करा,स्त्रीभ्रूणहत्या टाळा,पाणी वाचवा,बेटी बचाव व बेटी पढाव,रक्तदान हे श्रेष्ठदान,झाडे लावा झाडे जगवा असे संदेश देणारे मोठे फलक प्रदर्शित करण्यात आले होते अशी माहिती स्वप्नाक्षय  मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे व सचिव अशोक मोरे यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्रमुंबई