Join us

'गेलेले परत येऊ का? असे विचारत आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 6:01 AM

अजित पवार; कोणाला जायचे असेल तर आत्ताच जावे

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालाने वातावरण बदलले आहे. निवडणुकीपूर्वी जे लोक पक्ष सोडून गेले तेच आता फोन करून परत येऊ का, अशी विचारणा करत आहेत. त्यामुळे निवडणुकीत ज्यांचा पराभव झाला त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. काही लोकांच्या मनात अजून चलबिचल आहे. त्यांना जायचे असेल तर आत्ताच जावे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना कामाला लागण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात रविवारी पराभूत उमेदवारांची बैठक झाली. अजित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची स्थिती आपल्याला माहिती आहे. पण, शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाला उभे केले आहे. राज्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अवकाळी भागांची पाहणी करत आहेत. आतापासून माझ्यासह राष्ट्रवादीचे नेते राज्याच्या दौºयावर जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. बांधावर जाऊन पाहणी करा. नव्या दमाच्या तरूणांना संधी द्यायला हवी. थांबून चालणार नाही, कामाला लागा, असे ते म्हणाले.

संजय राऊतांचा आला मेसेजबैठक सुरू असतानाच संजय राऊत यांचा मला मेसेज आला आहे. निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा मला मेसेज आला आहे. आता मी त्यांना फोन करून मेसेजबद्दल विचारेन, असे ते म्हणाले.ते म्हणाले, महाआघाडीद्वारे निवडणूक लढवल्याने पाठिंब्याबाबत कोणताही एक पक्ष निर्णय घेणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे सहकारी मिळून निर्णय घेतील. मात्र, असा काही निर्णय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.केंद्रातून काही नेते, मंत्री राज्यात आले आणि मुख्यमंत्री झाले या माझ्या विधानाचा काहींनी कारण नसताना वेगळा अर्थ लावला आहे. शरद पवार यांच्याशी त्या विधानाचा दुरान्वये संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.मनसेबाबत सर्वांशी चर्चा करणारमनसेच्या आमदारास आम्ही आघाडीतर्फे पाठिंबा दिलेला होता. आघाडी मजबूत होण्याच्या दृष्टीने मनसेला सोबत घेण्याबाबत जेव्हा बैठक होईल तेव्हा हा मुद्दा मी मांडेन. आघाडीमध्ये अनेक पक्ष सहभागी आहेत, त्यामुळे आघाडीत एखाद्याचा समावेश करताना मला या सर्वांशी चर्चा करावीच लागेल, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईभाजपा