मुंबई : फळे, भाजी आणि अन्य वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्यांभोवती जमलेली गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करणाºया पोलिसांवर नागरिकांनी चिथावणीखोर घोषणाबाजीसह दगडफेक केली. ही घटना गोवंडीतील शिवाजी नगर झोपडपट्टीत रविवारी घडली. जमावाने पोलीस वाहनांचे नुकसान करत एका पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. ते थोडक्यात बचावले.शिवाजी नगर झोपडपट्टीतील ९० फिट येथील रस्ता क्रमांक ८ जवळील मशिदीजवळ रविवारी फेरीवाले मोठ्या प्रमाणात भाजी, फळे विकत होते. खरेदीसाठी नागरिकांनीही गर्दी केली होती. संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास शिवाजी नगर पोलीस तेथे दाखल झाले. नागरिकांना घरी जाण्याच्या सूचना देताच, त्यांनी हल्ला केला. दोन महिलांसह २५ ते ३० जणांनी चिथावणीखोर घोषणा देत पोलिसांवर दगडफेक केली. एकाने पोलीस अधिकाºयाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. तो वाचवताना त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.>सहा जणांना अटकजमावाविरोधात सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाºयावर हल्ला, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कोरोना साथरोग पसरविण्याचा प्रयत्न आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जमावातील सहा जणांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र पैठणकर यांनी दिली.>राज्यभरात पोलिसांवर हल्ले सुरूचराज्यभरात रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांवरील हल्ल्यांसदर्भात १५० गुन्हे दाखल करण्यात असून ४८२ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांवरील या हल्ल्यांमुळे त्यांच्या कुटुंबाकडून संताप व्यक्त होत आहे.
चिथावणीखोर घोषणाबाजीसह पोलिसांवर गोवंडीत दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 5:33 AM