मुंबईत २७ नोव्हेंबरपासून गोवर, रुबेला लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 06:45 AM2018-11-23T06:45:18+5:302018-11-23T06:45:40+5:30

गोवर या आजाराचे सन २०२० पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात मिझल व रुबेला (एमआर) लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे.

 Govar, Rubella vaccination campaign from November 27 in Mumbai | मुंबईत २७ नोव्हेंबरपासून गोवर, रुबेला लसीकरण मोहीम

मुंबईत २७ नोव्हेंबरपासून गोवर, रुबेला लसीकरण मोहीम

googlenewsNext

मुंबई : गोवर या आजाराचे सन २०२० पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात मिझल व रुबेला (एमआर) लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. तर मुंबईमध्ये २७ नोव्हेंबरपासून या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमधील १७ लाख विद्यार्थ्यांना इंजेक्शनद्वारे ही लस दिली जाणार आहे. २८ राज्यांतील ४१ कोटी मुलांना ही लस दिली जाणार आहे.
केंद्र सरकारने गोवर आणि रुबेला या दोन आजारांचे समूळ उच्चाटन करण्याची मोहीम गेल्या वर्षीपासून हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १४ कोटी मुलांना ही लस देण्यात आली आहे. मुंबईत या लसीकरण मोहिमेची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य आणि शिक्षण विभागावर आहे. त्यानुसार २७ नोव्हेंबरपासून मुंबईत मुलांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन आठवड्यांत शाळांमध्ये ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात आरोग्य केंद्र, आंगणवाडी, क्षेत्रीय लसीकरण केंद्र, दवाखाने, उपनगरी रुग्णालय येथे उर्वरित मुलांना लस दिली जाणार आहे. २७ नोव्हेंबरपासून दोन महिने ही मोहीम मुंबईत राबविली जाणार आहे.
पल्स पोलिओच्या लसीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पालकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे उच्चभ्रू वस्तीतील अनेक पालक ही लस आपल्याच खाजगी डॉक्टरकडून लावून घेण्याच्या मन:स्थितीत आहेत. मात्र एमआर ही लस सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटनेने या लसीचा दर्जा प्रमाणित केला आहे. इंजेक्शनद्वारे उजव्या दंडाच्या स्नायूत ही लस दिली जाणार आह. एकदा वापरल्यानंतर आपोआप नष्ट होणाºया आॅटोडिसेबल सिरंजद्वारे ही लस दिली जाणार असल्यामुळे ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याची माहिती पालिकेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दक्षा शहा यांनी दिली.

मुलांच्या सुरक्षेसाठी लसीकरण आवश्यक
गोवर हा संसर्गजन्य आणि घातक आजार असून तो लहान मुलांना होतो. या आजाराने दरवर्षी देशात ५० हजार मुलांचा मृत्यू होतो. त्यामुळे लसीकरण मोहीम घेतल्यास विषाणू पूर्णत: नष्ट होतील व रोगाचे समूळ उच्चाटन होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत उपस्थित तज्ज्ञांनी दिली.

Web Title:  Govar, Rubella vaccination campaign from November 27 in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई