वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक; चंद्रकांत पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 05:56 PM2023-08-23T17:56:31+5:302023-08-23T18:00:01+5:30

या सर्व कामासाठी लागणाऱ्या निधी साठी वित्त विभागाशी चर्चा करण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Goverment positive on question of senior college professors; Information of Minister Chandrakant Patil | वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक; चंद्रकांत पाटील यांची माहिती

वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक; चंद्रकांत पाटील यांची माहिती

googlenewsNext

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध प्रश्नासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबतच्या प्रलंबित प्रश्नाबाबत वित्त  विभागाशी चर्चा करून प्रश्न सोडवले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद, विधान सभेचे सदस्यांकडून  उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या विविध प्रश्न संदर्भात निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालय मध्ये बैठक आयोजित करण्यात आली. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक यांना देय दिनांकपासून कँसचे लाभ लागू करण्यात यावेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राधान्याने प्राध्यापक भरती आणि  महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत शासन कार्यवाही करत आहे. आदिवासी भागातील महाविद्यालय, नक्षलवादी भागातील महाविद्यालय, अल्पसंख्यांक महाविद्यालय, डोंगरी भागातील विद्यालय अशा सात ते आठ कॅटेगरीतून आपण हा विषय अनुदानाचा, प्राध्यापक भरतीचा पूर्ण करत आहोत. या सर्व कामासाठी लागणाऱ्या निधी साठी वित्त विभागाशी चर्चा करण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशनानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करण्यात येईल तसेच सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदी संदर्भात वित्त विभागाशी चर्चा करण्यात येईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर,आमदार मनीषा कायंदे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर , उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Goverment positive on question of senior college professors; Information of Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.