लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई, : भूजलाशयीन क्षेत्रात मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच परराज्यातून होणारी आयात कमी व्हावी व राज्यात उत्पादित होणाऱ्या मत्स्यबीजांची जास्तीत जास्त विक्री होण्याच्या उद्देशाने राज्यातील शासकीय मत्स्य बीज उत्पादन व संवर्धन केंद्रातून उत्पादित होणाऱ्या मत्स्यबीज विक्रीचे दर सुधारित करण्यात आले आहेत, अशी माहिती मत्स्य व्यवसाय विभागाने दिली.
भूजलाशयीन क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी मत्स्य शेतकरी, मत्स्य संवर्धक व मत्स्य कात्स्यकार यांना उत्तम प्रतीचे मत्स्य बीज पुरवण्यासाठी राज्य शासनाने ३२ मत्स्य बीज उत्पादन केंद्र, २ कोळंबी बीज उत्पादन केंद्र, ३२ मत्स्य बीज संवर्धन केंद्र व १ कोळंबी बीज संवर्धन केंद्र याप्रमाणे ६७ केंद्रांची स्थापना केली आहे. सद्यस्थितीत राज्याची एकूण मत्स्य बोटुकलीची मागणी सुमारे ११४ कोटी आहे. परंतु त्याचे राज्यात पुरेशा प्रमाणात उत्पादन नसल्याने परराज्यातून मत्स्य बीज आयात केले जाते. ते निकृष्ट दर्जाचे असल्याने मत्स्य उत्पादनात तफावत निर्माण होत आहे. यामुळे तसेच शासकीय मत्स्य बीज उत्पादन व संवर्धन केंद्रातून विक्री वाढविण्यासाठी राज्य शासनाने काही मत्स्य बीजांचे दर कमी केले आहेत.
* मत्स्य बीज विक्रीचे सुधारित दर : (कंसात जुने दर)
*प्रमुख कॉर्प : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमी) - १००० रुपये प्रति लक्ष (१५००), मत्स्य बीज (२० ते २५ मिमी) - १२५ रुपये प्रति हजार (२०० रुपये), अर्ध बोटुकली (२५ ते ५० मिमी) - २५० रुपये ते (३०० रुपये), बोटुकली (५० मिमीचे वर) - ५०० रुपये (६०० रुपये)
*मृगळ : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमी) - ८०० रुपये प्रति लक्ष (१५०० रुपये), मत्स्य बीज (२० ते २५ मिमी) - १२५ रुपये प्रति हजार (२०० रुपये), अर्ध बोटुकली (२५ ते ५० मिमी) - २५० रुपये (३०० रुपये), बोटुकली (५० मिमीच्या वर) - ५०० रुपये (५०० रुपये).
...................................