सरकारी नोकरीची संधी, शिक्षण विभागातील भरतीला सरकारची मान्यता

By महेश गलांडे | Published: January 30, 2021 10:41 AM2021-01-30T10:41:34+5:302021-01-30T10:42:43+5:30

आरोग्य विभागाकडून भरती प्रकियेची जाहिरात निघाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले

Government approves recruitment in education department, informed the Minister of Education varsha gaikwad | सरकारी नोकरीची संधी, शिक्षण विभागातील भरतीला सरकारची मान्यता

सरकारी नोकरीची संधी, शिक्षण विभागातील भरतीला सरकारची मान्यता

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण २६६ पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचा निर्णय झाला

मुंबई - कोरोना लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर आता राज्य सरकारने भरती प्रकियेला गती देण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील भरतीची गुडन्यूज दिल्यानंतर, पोलीस दलातही मोठी भरती लवकरच सुरु होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. त्यानंतर, आता शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनीही ट्विटरवरुन शिक्षण विभागातील भरतीसंदर्भात माहिती दिली आहे. 

आरोग्य विभागाकडून भरती प्रकियेची जाहिरात निघाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात होईल, असे अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी 2538 जागांची भरती झाल्यानंतर पुन्हा गरज पडल्यास आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले होते. आता, वर्षा गायकवाड यांनीही शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीसंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण २६६ पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलंय. त्यासोबतच, शासनाचे पत्रही जोडण्यात आले आहे. त्यामुळे, आता लिपिक पदासाठी लवकरच जाहिरात निघणार असून उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 
 

Read in English

Web Title: Government approves recruitment in education department, informed the Minister of Education varsha gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.