सरकार मुंबई बँकेच्या पाठीशी

By admin | Published: March 21, 2015 12:52 AM2015-03-21T00:52:15+5:302015-03-21T00:52:15+5:30

मुंबई बँक सर्वसामान्यांसाठी, दीनदुबळ्यांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाठीमागे राज्य सरकार ठामपणे उभे आहे,

Government backed by Mumbai Bank | सरकार मुंबई बँकेच्या पाठीशी

सरकार मुंबई बँकेच्या पाठीशी

Next

मुंबई : मुंबई बँक सर्वसामान्यांसाठी, दीनदुबळ्यांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाठीमागे राज्य सरकार ठामपणे उभे आहे, असा स्पष्ट निर्वाळा राज्याचे गृहनिर्माण आणि कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी दिला.
मुंबई बँकेच्या वांद्रे (प.) येथील शाखेचे उद्घाटन प्रकाश मेहता यांच्या हस्ते सोमवारी झाले; या वेळी ते बोलत होते. मेहता म्हणाले की, मुंबई बँक खऱ्या अर्थाने सर्वसामान्य, दीनदुबळ्यांसाठी, हमाल-फेरीवाल्यांसाठी काम करणारी बँक आहे. मुंबई बँकेने हाती घेतलेल्या गिरणी कामगारांची घरे, बेरोजगारांसाठी रोजगाराची योजना तसेच स्वयंपुनर्विकास आदी मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच एक बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, सहकारातील ज्येष्ठ नेते व बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, माजी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्ष प्रकाश शिरवाडकर तसेच भाऊसाहेब पारले, नंदकुमार काटकर, वसंतराव सूर्यवंशी, नितीन बनकर, संदीप घनदाट, पुरुषोत्तम दळवी,
शिल्पा सरपोतदार, आनंद गोळे, अनिल गजरे
तसेच सरव्यवस्थापक डी.एस. कदम आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. (वा. प्र.)

Web Title: Government backed by Mumbai Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.