हे सरकार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शेतकर्यांची फसवणूक करतेय - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 02:23 PM2018-01-25T14:23:01+5:302018-01-25T14:24:34+5:30
हे सरकार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शेतकर्यांची फसवणूक करते आहे. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांविषयी अनास्था आणि दलालांची बजबजपूरी यामुळे हे सरकार...
मुंबई- खासदार राजू शेट्टी यांनी जेजे रूग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे या घटनांमधून स्पष्ट झाले आहे, असं खासदार राजू शेट्टी म्हणाले.
हे सरकार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शेतकर्यांची फसवणूक करते आहे. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांविषयी अनास्था आणि दलालांची बजबजपूरी यामुळे हे सरकार सामान्य माणसांसांठी काम करत नसल्याचं ठसठशीत उदाहरण यानिमित्तानं समोर आल्याचं खासदार शेट्टी म्हणाले. धर्मा पाटील यांना 200 गूंठे बागायती शेतीसाठी ४लाख रुपये नुकसान सरकारकडून दिली जातेय मात्र दुसरीकडे त्याच गटातील ७४ गुंठे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांला १कोटी ८९ लाख रुपये भरपाई मिळते, हे कुठलं शास्त्र सरकारने आणी उर्जामंत्री बावनकुळे यांनी शोधुन काढलंय असा सवालही खासदार राजु शेट्टी यांनी उपस्थित केलाय. दरम्यान धर्मा पाटील यांच्या मुलाने सरकारने दिलेली १५ लाख रुपयांची मदत नाकारलीय. जर सरकारने योग्य मदत दिली नाही तर बापाने मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिलाय. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना संबंधित शेतकऱ्या पाठीशी असल्याचं खासदार शेट्टी म्हणाले.
खासदार राजू शेट्टी यांनी घेतली धर्मा पाटील यांची भेट घेतली त्यावेळचा एक क्षण...