मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही- चंद्रकांत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 12:59 PM2023-10-18T12:59:13+5:302023-10-18T12:59:43+5:30

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चंद्रकांत पाटील यांची भेट

Government committed to development of Maratha community; Funds will not be allowed to fall from the government, said that Chandrakant Patil | मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही- चंद्रकांत पाटील 

मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही- चंद्रकांत पाटील 

मुंबई: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून आतापर्यंत २३ हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना २५ कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कमेचा व्याज परतावा देण्यात आला आहे. यापुढे लाभार्थ्यानी व्याज परताव्याचा दावा केल्यानंतर सात दिवसाच्या आत व्याज परताव्याचा लाभ देण्याकरिता महामंडळांनी कार्यपद्धतीचे कालबद्ध नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

आज सकाळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट देऊन महामंडळाच्या कामकाजाविषयी आढावा घेऊन सविस्तर चर्चा केली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, दि. १७ ऑक्टोबर, २०२३ पर्यतचे  व्याज परताव्यासाठी दाखल झालेली सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. आतापर्यत ५५४ कोटी पेक्षा अधिक व्याज परतावा अर्थसहाय्य मराठा समाजाकरिता देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत महामंडळाकडे व्याज परताव्याचे एकही प्रकरण प्रलंबित नाहीत.
 
आज सकाळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ६ हजार लाभार्थ्यांना ४.६५ कोटी रुपयांचा व्याज परतावा ऑनलाईल स्वरुपात वितरीत करण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजनांना सर्वोत्तम प्रतिसाद मिळत असून या योजनांच्या माध्यमातून राज्यभरात जवळपास ७० हजार पेक्षा जास्त अधिक मराठा उद्योजक तयार झाले आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मितीस चालना मिळत आहे. या योजनेसाठी राज्य शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Government committed to development of Maratha community; Funds will not be allowed to fall from the government, said that Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.