सालेमच्या सुटकेच्या याचिकेवर उत्तर देण्याचे सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 08:07 IST2025-03-13T08:07:45+5:302025-03-13T08:07:45+5:30

भारत आणि पोर्तुगाल यांच्यात झालेल्या प्रत्यर्पण करारानुसार सालेमची शिक्षा पूर्ण

Government directed to respond to Abu Salem release plea | सालेमच्या सुटकेच्या याचिकेवर उत्तर देण्याचे सरकारला निर्देश

सालेमच्या सुटकेच्या याचिकेवर उत्तर देण्याचे सरकारला निर्देश

मुंबई : सन १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात २५ वर्षांहून अधिक काळ कारावास भोगल्यानंतर शिक्षा माफ करण्यासाठी आणि अकाली सुटकेसाठी गँगस्टर अबू सालेमने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली; तर राज्य सरकारला याचिकेवर  उत्तर देण्याचे निर्देश दिले.

भारत आणि पोर्तुगाल यांच्यात झालेल्या प्रत्यर्पण करारानुसार त्याने शिक्षा पूर्ण केली आहे. या करारानुसार, त्याला २५ वर्षांहून अधिक काळ कारागृहात ठेवू शकत नाही, असे सालेमने याचिकेत म्हटले आहे. १० मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्या. सारंग कोतवाल व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने सालेम याला केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी दिली.

Web Title: Government directed to respond to Abu Salem release plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.