शासकीय कर्मचा-यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिल थकीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 05:47 PM2018-05-23T17:47:45+5:302018-05-23T17:47:45+5:30

  शासकीय निवासस्थानात राहणाºया शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिलाची कुठलीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र निवासस्थान उपलब्ध करून देणा-या सक्षम अधिका-याकडे सादर करावे लागणार आहे.

government employees News | शासकीय कर्मचा-यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिल थकीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

शासकीय कर्मचा-यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिल थकीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

googlenewsNext

मुंबई -  शासकीय निवासस्थानात राहणाºया शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिलाची कुठलीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र निवासस्थान उपलब्ध करून देणा-या सक्षम अधिका-याकडे सादर करावे लागणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने दि. २२ मे २०१८ रोजी शासन परिपत्रकद्वारे आदेश जारी केले आहेत.
शासकीय निवासस्थानात राहणारे अधिकारी  किंवा कर्मचारी शासकीय निवासस्थान सोडताना  वीजबिल भरत नाहीत किंवा प्रलंबित ठेवत असल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर या निवासस्थानात राहण्यासाठी .येणा-या अधिकारी किंवा कर्मचाºयांना प्रलंबित वीजबिलामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या थकित बिलाची वसुली करतांना संबंधित वीज कंपन्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
उदय योजनेबाबत गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संनियंत्रण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शासकीय निवासस्थानात राहणाºया शासकीय अधिकारी किंवा कर्मचा-यांना शासकीय निवासस्थान सोडताना महावितरण कंपनीकडून वीज देयकाची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकारी किंवा कर्मचा-यांना घेणे बंधनकारक करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार शासकीय निवासस्थानात राहणा-या अधिकारी किंवा कर्मचा-यांना शासकीय निवासस्थान सोडताना महावितरणकडून (मुंबई व उपनगर वगळता) वीजबिलाची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मिळवून ते सक्षम अधिका-याकडे सादर करावे लागणार आहे.
याशिवाय सक्षम अधिका-याने शासकीय निवासस्थान सोडणा-या शासकीय अधिकारी किंवा कर्मचा-याने त्यांच्या ताब्यातील निवासस्थानाचे वीजबील थकित नसल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय निवासस्थानाचा ताबा घेण्याबाबतची कार्यवाही करु नये, असेही शासन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: government employees News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.