दिव्यांग डब्यातून सरकारी कर्मचाऱ्यांचा राजरोस प्रवास

By admin | Published: March 16, 2017 03:26 AM2017-03-16T03:26:45+5:302017-03-16T03:26:45+5:30

लोकलच्या दिव्यांग डब्यातून अन्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई असतानाही सरकारी कर्मचारी मात्र बिनदिक्कतपणे प्रवास करतात

Government employees' trip | दिव्यांग डब्यातून सरकारी कर्मचाऱ्यांचा राजरोस प्रवास

दिव्यांग डब्यातून सरकारी कर्मचाऱ्यांचा राजरोस प्रवास

Next

मुंबई : लोकलच्या दिव्यांग डब्यातून अन्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई असतानाही सरकारी कर्मचारी मात्र बिनदिक्कतपणे प्रवास करतात. अशा सरकारी कर्मचाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कारवाईत तब्बल १0२ सरकारी कर्मचारी अडकले. यात रेल्वे पोलिसांबरोबर रेल्वे कर्मचारी तसेच अन्य सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लोकलच्या आरक्षित दिव्यांग डब्यातून अन्य प्रवासीही प्रवास करताना आढळतात. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांचे नेहमी अन्य प्रवाशांसोबत खटके उडतात.
रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाईही केली जाते. तरीही पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण होते. करण्यात येत असलेल्या कारवाईत सरकारी कर्मचारीही असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे सुरक्षा दलाने फेब्रुवारी महिन्यात दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात ही मोहीम हाती घेतली होती.
फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १0२ सरकारी कर्मचारी अडकले. यामध्ये १ आरपीएफ, २४ लोहमार्ग पोलीस, ९ रेल्वे कर्मचारी, एक पालिका कर्मचारी असून, उर्वरित हे विविध खात्यांतील कर्मचारी असल्याची माहिती मध्य रेल्वे आरपीएफकडून देण्यात आली. यामधील २५ जणांना रेल्वे न्यायालयात हजर करून दंड आकारण्यात आला. तर अन्य जणांना टीसींमार्फत दंड करण्यात आल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

सामान्य प्रवाशांवरही कारवाई
यासंदर्भात मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले की, दिव्यांग प्रवाशांच्या आरक्षित डब्यात अन्य प्रवाशांकडून घुसखोरी केली जाते. अशा प्रवाशांवर नेहमी कारवाई केली जाते.
सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर १ हजार २२ सामान्य प्रवासीही आढळले. ६00 जणांना न्यायालयात हजर करून दंड आकारण्यात आला. तर अन्य जणांना टीसींकडून दंड करण्यात आला.यात सरकारी कर्मचारीही असल्याचे आढळले आहेत. फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कारवाईत १0२ कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले.

फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १0२ सरकारी कर्मचारी अडकले. यामध्ये १ आरपीएफ, २४ लोहमार्ग पोलीस, ९ रेल्वे कर्मचारी, एक पालिका कर्मचारी असून, उर्वरित हे विविध खात्यांतील कर्मचारी असल्याची माहिती मध्य रेल्वे आरपीएफकडून देण्यात आली.

Web Title: Government employees' trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.