सरकारी कर्मचारी रजा आंदोलन मागे घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:35 AM2018-12-29T05:35:18+5:302018-12-29T05:35:32+5:30

राजपत्रित अधिकारी महासंघाने ५ जानेवारी रोजी सामूहिक रजा आंदोलनाची घोषणा केली असली तरी शुक्रवारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.

 Government employees to withdraw leave? | सरकारी कर्मचारी रजा आंदोलन मागे घेणार?

सरकारी कर्मचारी रजा आंदोलन मागे घेणार?

googlenewsNext

- विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजपत्रित अधिकारी महासंघाने ५ जानेवारी रोजी सामूहिक रजा आंदोलनाची घोषणा केली असली तरी शुक्रवारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.
महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सातवा वेतन आयोग राज्यात लागू केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मात्र, पाच दिवसांचा आठवडा आणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या मागणीबाबत महासंघ ठाम असल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर, आम्ही सातवा वेतन आयोग दिलेला आहे आणि अन्य मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले व ५ जानेवारीचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
महासंघाच्या पदाधिकाºयांची २ जानेवारी रोजी बैठक घेऊन ५ तारखेच्या आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. शिष्टमंडळात ग. दि. कुलथे, विनोद देसाई, समीर भाटकर, विष्णु पाटील आदींचा समावेश होता.

Web Title:  Government employees to withdraw leave?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.