Join us

लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर सरकारने उगारला बडगा; प्रत्येक तिसरा लेटमार्क ठरणार रजा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 1:03 AM

सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी जारी केला आहे.

मुंबई : कार्यालयात उशिराने पोहोचणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात चांगलाच चाप बसणार आहे. महिन्यातून केवळ दोन वेळाच जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत असणार आहे. त्यानंतरच्या तिसऱ्या ‘लेटमार्क’साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची रजा वजा करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी जारी केला आहे.

मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय विभाग, कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सकाळी कार्यालयात पोहोचण्यासाठी एका महिन्यात दोन वेळा जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत असेल. त्यानंतरच्या तिसऱ्या उशिरा उपस्थितीसाठी एक नैमित्तिक रजा वजा करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत.

शिवाय, एकाच महिन्यातील तीनपेक्षा अधिक वेळा उशिरा उपस्थितीसाठी म्हणजेच सहाव्या, नवव्या, आदीसाठी प्रत्येकी एक नैमित्तिक रजा वजा करावी. नैमित्तिक रजा शिल्लक नसेल तर अर्जित रजा वजा करावी. ज्यांची अर्जित रजा शिल्लक नसेल, त्यांची असाधारण रजा (विनावेतन) मंजूर करावी. रजेची सवलत महिन्यातील केवळ पहिल्या नऊ उशिरा उपस्थितीसाठी असेल. त्यापुढील उशिरासाठी असाधारण (विनावेतन) रजा मंजूर करण्यात यावी. परिवर्तित रजा ही केवळ वैद्यकीय कारणास्तव मंजूर (पान ५ वर)

टॅग्स :महाराष्ट्र सरकारकर्मचारी