Join us

ज्येष्ठांच्या अत्याचारांविरोधात सरकारने कठोर कायदे करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 2:35 AM

जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिन - फेस्कॉमची मागणी : आजारपणामुळे कलह

सागर नेवरेकर 

मुंबई : एकत्रित कुटुंब पद्धतीचा ºहास आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा उदय झाल्यामुळे ज्येष्ठांवरील अत्याचारांच्या प्रमाणात वाढ होत गेली. ज्येष्ठांवर होणारे अत्याचार ही पाश्चिमात्यांची देण आहे. कालांतराने शहरामध्ये वसलेल्या विभक्त कुटुंबांमध्ये जास्त दुरावा निर्माण होत गेला. त्यामुळे मुलांकडे आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे पालन-पोषण व लक्ष देण्यासाठी वेळ अपुरा पडू लागला. वृद्धांना आजारपण आले की घरात कलह सुरू होतो. याशिवाय समाज माध्यम, राहणीमान, सुख-सुविधा बदलल्यामुळे ज्येष्ठांच्या अडचणींमध्ये भर पडत गेली. म्हणून ज्येष्ठांच्या अत्याचाराबाबत सरकारने कठोर कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)ने केली आहे.

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी यासंदर्भात सांगितले की, ५० टक्के वृद्धांच्या वाट्याला छळ, अपमान, उपेक्षा येत असून याला कुटुंब आणि मित्रपरिवार कारणीभूत असतात. वृद्धांना कायद्याचे संरक्षण आहे. समाजात वृद्धांचा शारीरिक छळ हा मोठ्या प्रमाणात होत असतो. तसेच आर्थिक चणचण व कमी भविष्य निर्वाह निधी मिळत असून त्यात त्यांच्या महिन्याभराच्या गरजा भागत नाहीत. वृद्धांचे आर्थिक, शारीरिक आणि सामाजिक छळ होतात. या समस्या सोडविण्यासाठी सरकार उदासीन आहे. सरकारला शासन निर्णय काढण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो.ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले की समजा घरामध्ये कलह सुरू झाला. वृद्धांचा छळ होण्यामागे मुख्य कारण ‘आरोग्य बिघडणे’ हे होय. अत्याचारग्रस्त वृद्धांचा न्यायालयीन निकाल त्वरित लागावा. २००७ च्या कायद्याची अंमलबजावणी काळजीपूर्वक व्हावी.प्रांत अधिकाऱ्यांनी ज्येष्ठांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे इत्यादी मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत. सरकारने सक्षम कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी, असेही अण्णासाहेब टेकाळे म्हणाले.ज्येष्ठांचे ४ हजार संघ८४ टक्के वृद्ध हे कुटुंबासोबत राहतात. ७ टक्के वृद्ध हे एकटेच राहतात. ७ टक्के वृद्ध हे पत्नीसहराहतात. एकटे आणि सहपत्नीक वृद्धांचा शेजारी व काळजीवाहू इत्यादी लोकांकडून छळ होतो. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघा (फेस्कॉम)मध्ये ज्येष्ठ नागरिकांचे चार हजार ५६२ संघ आहेत. यामध्ये २७६ ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे. 

टॅग्स :मुंबई