शासकीय रुग्णालयांचे सुरक्षारक्षक गेल्या सहा महिन्यांपासून वेतनाविना
By admin | Published: August 21, 2014 11:17 PM2014-08-21T23:17:25+5:302014-08-21T23:17:25+5:30
रायगड सुरक्षा मंडळाकडून जिल्हय़ात विविध सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयामधून सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Next
संदीप जाधव ल्ल महाड
रायगड सुरक्षा मंडळाकडून जिल्हय़ात विविध सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयामधून सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाडमधील ट्रॉमा केअर, माणगांव आणि पोलादपूरमधील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुरक्षा बोर्डाचे सुरक्षारक्षक पहारा देत आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यापासून हे सुरक्षारक्षक वेतनाविनाच काम करीत आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर या सुरक्षारक्षकांवर उपासमारीची पाळी आली आहे.
विविध शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमधून सुरक्षारक्षकांची गरज असते. ही गरज लक्षात घेवून जिल्हय़ात एक सुरक्षा रक्षक बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या अंतर्गत अनेक शासकीय कार्यालयामधून सुरक्षारक्षक नेमले गेले आहेत. यापैकी महाडच्या ट्रॉमा केअरमध्ये तीन सुरक्षारक्षक नियुक्त आहेत. या ठिकाणी सतत रुग्णांची ये जा चालू असते. शिवाय एखादा अपघात झाल्यास तणावजन्य स्थिती उद्भवत असते, अशा वेळी सुरक्षा रक्षकांची नितांत गरज भासते.
महाडप्रमाणोच माणगांवमध्ये सहा, पोलादपूरमध्ये तीन सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. मात्र गेले सहा महिने सुरक्षा बोर्डाकडून सुरक्षारक्षकांना पगारच मिळालेला नाही. फेब्रुवारी महिन्याचा पगार या सुरक्षा रक्षकांना जुलै महिन्यात देण्यात आला आहे. यामुळे गेले सहा महिने हे सुरक्षारक्षक अत्यंत हलाखीचे जीवन कंठत आहेत. ही अवस्था संपूर्ण रायगड जिल्हय़ात असून अलिबागमधील सिव्हील हॉस्पीटलमधील सुरक्षारक्षक देखील वेतनापासून वंचित राहीले आहेत.
एकीकडे राज्यात नोक:यांचा प्रश्न गंभीर असल्याने मिळेल ती नोकरी करण्याकडे तरुणांचा कल आहे. या सुरक्षा बोर्डाकडून अनेकांना रोजगाराची संधी मिळाली असली तरी शासनाच्या दिरंगाईचा फटका या सुरक्षारक्षकांना बसत आहे. ऐन पावसाळय़ात वेतन मिळाले नाही आता सणासुदीचे दिवस आल्याने हातात पैसा असणो गरजेचे आहे. आधीच महागाईने पिचलेल्या लोकांना हातात पैसा नसेल तर सण कसा साजरा करायचा याची चिंता लागली आहे.
शासनाने त्वरीत हा पैसा बोर्डाकडे दिल्यास सुरक्षारक्षकांचा पगार वेळत होईल आणि सण आनंदाने साजरा करता येईल, अशी अपेक्षा या सुरक्षारक्षकांनी व्यक्त केली.
याबाबत आपण वारंवार रुग्णालयांच्या अधिक्षकांजवळ बोललो आहे शिवाय त्यांच्या ठाणो कार्यालयाजवळ या सुरक्षारक्षकांच्या वेतनाची मागणी केली आहे. मात्र या कार्यालयाकडून अद्याप कोणतीच कारवाई झालेली नसून वास्तविक पाहता रुग्णालयांच्या अधिक्षकांनी वेतन देण्याबाबत ठाणो कार्यालयाला मागणी करणो गरजेचे आहे. आरोग्य विभागाच्या ठाणो कार्यालयाला शासनाने ग्रॅट दिल्यासही या रुग्णालयांकडे वर्ग होईल आणि आम्हाला या सुरक्षा रक्षकांचे वेतन करण्यास कोणतीच अडचण येणार नाही, असे रायगड सुरक्षा बोर्डाचे निरीक्षक एम. एच. पवार यांनी सांगितले.