नोकरदार मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतीगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 08:05 PM2024-01-15T20:05:23+5:302024-01-15T20:05:32+5:30
तीन वर्षांपर्यत वसतिगृहात राहण्याची मुभा तसेच प्रवेशासाठी ५ हजार अनामत रक्कम अशा काही अटी अर्जासोबत आहेत.
श्रीकांत जाधव
मुंबई - नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांच्या बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक पात्र महिलांनी चेंबूर येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
अर्जदार नोकरदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असून अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच अनाथ या वर्गवारीतील असावी, अर्जासोबत नोकरीचे नेमणुकीचे बदलीचे पत्र, मासिक उत्पन्न ३० हजार पेक्षा जास्त नसावे, तीन वर्षांपर्यत वसतिगृहात राहण्याची मुभा तसेच प्रवेशासाठी ५ हजार अनामत रक्कम अशा काही अटी अर्जासोबत आहेत. अधिक माहितीसाठी चेंबूर पूर्वे येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासकिय व्यवस्थापक किरण म्हेत्रे यांनी केले आहे.