चिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या औषधांच्या यादीसाठी शासनाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 01:23 AM2019-10-11T01:23:23+5:302019-10-11T01:23:41+5:30
डीसीसीच्या निर्णयानुसार, उपसमितीद्वारे या औषधांची यादी तयार करून याबाबतच्या नियमांमध्ये कोणते बदल व्हावेत याचा मसुदा तयार करावा.
मुंबई : केंद्र शासनाच्या वतीने प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणाºया औषधांची यादी तयार करण्यात येणार आहे. ड्रग्ज कन्सल्टेटीव्ह कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणाºया औषधांची यादी केली जाणार आहे. त्यात ज्या औषधांचा समावेश करण्यात आला असेल केवळ तीच औषधे ओव्हर द काउंटर म्हणजेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय रुग्णांना घेता येणार आहेत.
पहिल्यांदा सरकारकडून ओव्हर द काउंटर मिळणाºया औषधांची यादी करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेण्यात येणाºया औषधांचे प्रमाण कमी व्हावे हा यामागील उद्देश आहे.
डीसीसीच्या निर्णयानुसार, उपसमितीद्वारे या औषधांची यादी तयार करून याबाबतच्या नियमांमध्ये कोणते बदल व्हावेत याचा मसुदा तयार करावा. यासंदर्भात महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे म्हणाले, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणती औषधे मिळतील याची ड्रग्ज कन्सल्टेटीव्ह कमिटी यादी तयार करणार आहे. या यादीमध्ये कोणत्या औषधांचा समावेश करण्यात आला आहे यावर या निर्णयाचा फायदा होईल की तोटा हे सांगता येईल. मात्र यामुळे देशातील फार्मासिस्टची भूमिका वाढेल. कारण रुग्णांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देताना ते कसे घ्यावे, त्याचे फायदे फार्मासिस्टना समजावून द्यावे लागतील. जनरल फिजीशियन डॉ. जयेश लेले म्हणाले, ओव्हर द काउंटर मिळणाºया औषधांची ड्रग्ज कन्सल्टेटीव्ह कमिटी जर यादी तयार करीत असेल तर त्याचा फायदा होईल. यामुळे शेड्युल एच ड्रगही रुग्णांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत. मात्र ॉरुग्णांकडून डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनचा पुन्हा वापर होणार नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.