गवर्इंच्या स्मारकासाठी सरकारचा पुढाकार

By admin | Published: August 19, 2015 02:34 AM2015-08-19T02:34:46+5:302015-08-19T02:34:46+5:30

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब उर्फ रा. सू. गवई यांच्या स्मारकासाठी आवश्यक जमीन आणि निधी राज्य सरकार देईल, अशी घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र

Government initiatives for the memorial of the Gov. | गवर्इंच्या स्मारकासाठी सरकारचा पुढाकार

गवर्इंच्या स्मारकासाठी सरकारचा पुढाकार

Next

मुंबई : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब उर्फ रा. सू. गवई यांच्या स्मारकासाठी आवश्यक जमीन आणि निधी राज्य सरकार देईल, अशी घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये गवई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सायंकाळी आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
फडणवीस म्हणाले की दादासाहेब राज्याचे भूषण होते. राजकीय अस्पृश्यता दूर करण्याचे काम त्यांनी केले. म्हणूनच सामान्य लोकांना प्रेरणा मिळून त्यांच्या कार्याची दिशा आणि महती कळेल, असे स्मारक सरकार उभारेल. त्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांचे मत लक्षात घेण्यात येईल. कारण वेगवेगळ््या पक्षांच्या नेत्यांना एकत्र घेऊन सर्वसमावेशक राजकारण करण्याचा आदर्श दादासाहेबांनी करून दाखवला. दरम्यान, दादासाहेब यांच्या विधान परिषदेतील कामाचा लेखाजोखा पुस्तकरूपात करण्याच्या बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला. त्यासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळाला विनंती करून विधान परिषदेतील दादासाहेबांची भाषणे मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. राज्यसभेतही दररोज अभ्यास करून ते मुद्दे मांडत होते. त्यामागील कारण विचारता उपेक्षित समाजाचे आपण एकमेव प्रतिनिधी असल्याचे कारण दादासाहेब देत असे. एकंदरीतच परिवर्तनाचा विचार सांभाळत वैचारिक मतभेद दूर ठेऊन सार्वजनिक जीवनात वैयक्तिक सलोख्याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला. सर्व राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तोच आदर्श जतन करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही पवार यांनी सांगितले.
दादासाहेबांनी नेहमीच विचारांची लढाई केली. तोच मार्ग निवडून रिपाइंचा वारसा पुढे चालवणार असल्याचे मनोगत गवई यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई यावेळी व्यक्त केले. या सभेत खासदार संजय राऊत, खासदार भालचंद्र मुणगेकर, खासदार राजू शेट्टी, आमदार महादेव जानकर, आमदार अबू आसीम आझमी, विनायक मेटे, प्रकाश रेड्डी, अविनाश महातेकर इत्यादी नेते उपस्थित होते.

Web Title: Government initiatives for the memorial of the Gov.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.