Join us

ओबीसी विषयाबाबत सरकार गंभीर नाही; विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 2:42 PM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ दिला आहे. जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी दाखल्यांची मागमी केली. तर दुसरीकडे आता ओबीसी समाजातून आरक्षाणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. काल मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विरोध केला आहे. आता विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. 

“ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण समाजाने आम्हाला...”: मनोज जरांगे पाटील

विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले, एकिकडे सरकार मराठा आरक्षाबाबत तत्परता दाखवत आहे. फटाफट निर्णयही घेत आहे. तर दुसरीकडे याचिका दाखल केली आहे, त्या याचिकाकर्त्यांना त्या संदर्भात सरकार गंभीर दिसत नाही. ओबीसींच्या विषयाला घेऊन सरकार गंभीर दिसत नाही. या दोन समाजात तेढ निर्माण झाला असताना सरकारचे ओबीसींकडे लक्ष नाही. ओबीसींच्या हक्काच मिळत असताना ते त्यांना मारायचं आहे का?, असा सवालही विजय वड्डेटीवार यांनी केला. 

"एकिकडे ओबीसींसाठी आम्ही लढतोय असं सांगायचं , ओबीसी आमच्या रक्तात आहे असं सांगायचं आणि दुसरीकडे न्यायालयात सरकारची बाजू मांडताना वेळ काढू पणा करायचा. हे अजिबात चालणार नाही, सरकारने गंभीरपणे घेतलं पाहिजे, अफीडेव्हीट आणि म्हणं सरकारने लवकरात लवकर मांडले पाहिजे, असंही वड्डेटीवार म्हणाले.   

“ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले: जरांगे पाटील

 

मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. कुणबी प्रमाणपत्रे मिळण्यास सुरुवात झाली आहे. २४ डिसेंबरला आरक्षण मिळेल. कुणीही आत्महत्या करु नये. मराठा आरक्षणासाठीची एकी आपली दिसली पाहिजे. काही मागेपुढे झाले तर आपल्याला सज्ज राहायचे आहे. कुणीही मतभेद होऊ देऊ नका. आपण एकजूट ढळू द्यायची नाही. आपली एकी आपण दाखवून देऊ, असे आवाहन करत, ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, असे मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. 

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आता महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे जाहीर केले. आम्ही राज्यातील मराठा समाजाची गाठीभेटी घेण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करत आहे. १५ नोव्हेंबर २०२३ पासून ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा सुरू करत आहे. यासह हा तिसरा टप्पा संपणार आहे. आम्ही असे सहा टप्प्यात दौरा करणार आहोत. पुढे चौथा, पाचवा, सहाव्या टप्प्यातील दौरा करणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली. यावेळी ओबीसी नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर मनोज जरांगे यांनी भाष्य केले. 

टॅग्स :विजय वडेट्टीवारओबीसी आरक्षणमराठा आरक्षण