राजेश निस्ताने
यवतमाळ : आरोग्यसेवा संचालनालयाने शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना २४ तास शवविच्छेदन करण्याचे बंधन घातले आहे, परंतु त्यानंतरही सायंकाळ झाली, अंधार पडला, लाइट नाही, अशी कारणे सांगून डॉक्टर शवविच्छेदनास टाळाटाळ करतात. अनेकदा त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो.
अपघाती व संशयास्पद मृत्युप्रकरणे पोलिसांना हाताळावी लागतात. अशा वेळी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने पोलिसांपुढे कुणाला कोणत्या कलमाखाली अटक करावी, याबाबत पेच निर्माण होतो. सायंकाळची वेळ असेल, तर पोलीस उत्तरीय तपासणी करावी, म्हणून डॉक्टरांकडे आग्रह धरतात. मात्र, अंधार पडला, आता शवविच्छेदन दुसºया दिवशी सकाळीच असे म्हणून डॉक्टर हात वर करतात.वास्तविक, आरोग्यसेवा संचालनालयाच्या ६ आॅक्टोबर, २००५च्या आदेशात २४ तास शवविच्छेदनाचे बंधन घातले गेले आहे. १२ सप्टेंबर, २००५ ला मुंबई येथे अवर गृहसचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २४ तास शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदांचे जिल्हा आरोग्य अधिकारी अशा सर्वांना हे आदेश जारी केले गेले आहे. सर्व जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध आहे. वास्तविक, सिव्हिल मेडिकल कोडमधील परिच्छेद क्र. ७४२ अन्वये शवविच्छेदन वेळेच्या वेळी करणे वैद्यकीय अधिकाºयाचे कर्तव्य ठरते....अन् मध्यरात्री उघडली शवागाराची दारेच्काही महिन्यांपूर्वी परप्रांतीय मजुरांच्या वाहनाला यवतमाळ जिल्ह्यात अपघात झाला होता. त्यात अनेक जण मृत्युमुखी पडले. रात्रीचे शवविच्छेदन होत नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्याने मृताचे नातेवाईक कडाक्याच्या थंडीत शासकीय विश्रामभवनाच्या परिसरात झोपले होते.च्आमदार बच्चू कडू यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी मध्यरात्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना फोन करून व त्यांची झाडाझडती घेऊन लगेच शवागाराची दारे उघडायला लावली. तेवढ्या रात्री सर्व मृतदेहांची उत्तरीय तपासणी होऊन सकाळी नातेवाईक मृतदेह घेऊन आपल्या प्रांताकडे रवाना झाले.