‘शासकीय कार्यालये दोन शिफ्टमध्ये सुरू ठेवा’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 03:24 AM2018-08-12T03:24:15+5:302018-08-12T03:24:33+5:30

शासकीय कार्यालये दोन शिफ्टमध्ये सुरू ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

'Government Offices continue in two shifts' | ‘शासकीय कार्यालये दोन शिफ्टमध्ये सुरू ठेवा’

‘शासकीय कार्यालये दोन शिफ्टमध्ये सुरू ठेवा’

googlenewsNext

मुंबई : शासकीय कार्यालये दोन शिफ्टमध्ये सुरू ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महासंघाचे अध्यक्ष अ. द. कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, दोन शिफ्टमध्ये कार्यालये सुरू राहिल्यास कर्मचाऱ्यांवरील भार हलका होऊन नागरिकांनाही त्यांची कामे वेळेत करता येतील. शासकीय कामासाठी सुट्टी घ्यावी लागत असल्याची तक्रार नागरिक करतात. म्हणूनच एका दिवसात काम झाले नाही, तर ते त्रागा करतात. परिणामी, बहुतेक कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वाद होतात. म्हणूनच दोन शिफ्टमध्ये शासकीय कार्यालये सुरू ठेवल्यास प्रत्येक नागरिक स्वत:च्या सोयीनुसार शासकीय कार्यालयात येऊ शकेल. त्यामुळे कर्मचाºयांनाही मनस्ताप होणार नाही.
महासंघाने सुचविल्याप्रमाणे दोन शिफ्टमध्ये काम करताना सकाळी १० ते सायंकाळी ५ आणि दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत कर्मचाºयांना काम करता येईल. त्यामुळे नागरिकांना दररोज ११ तास सेवा मिळेल, तर कर्मचाºयांच्या कामाचा रोजचा एक तास कमी
होईल. महत्त्वाचे म्हणजे वेळेत
बदल केल्याने रेल्वेसह बेस्ट,
टॅक्सी, रिक्षा अशा सर्वच वाहतुकीवरील ताणही विभागला जाईल. याआधी न्यायालयानेही शासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल करण्याचा सल्ला सरकारला दिला होता. त्याचाच विचार करीत महासंघाने हा प्रस्ताव दिला आहे. त्याचा मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार केल्यास नक्कीच नागरिकांसह कर्मचाºयांना दिलासा मिळेल, असे महासंघाचे म्हणणे आहे.

५ दिवसांचा आठवडा,
६ दिवस सेवा!

रविवारची सुट्टी कायम ठेवताना इतर सहा दिवसांत प्रत्येक कर्मचाºयाला वेगवेगळ्या दिवशी सुट्टी देण्याची मागणी महासंघाने केली आहे. जेणेकरून प्रत्येक कार्यालयातील कर्मचाºयाला दोन दिवस सुट्टी मिळेल, तर नागरिकांसाठी सलग ६ दिवस कार्यालये खुली राहतील. त्यामुळे कामांचाही खोळंबा होणार नाही.

Web Title: 'Government Offices continue in two shifts'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.